शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील प्रकल्प अडचणीत

By admin | Updated: February 10, 2015 00:25 IST

विकास योजनाच बंद : शहरवासीयांना प्रतीक्षा आता पुढील कार्यवाहीची

चिपळूण : केंद्र व राज्य शासनातर्फे राबवण्यात येणारी एकात्मिक शहर विकास योजना बंद झाल्याने चिपळूण शहरात सुरु असणाऱ्या अंदाजे साडेतीन कोटींच्या प्रकल्पांची कामे रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही वर्षात या योजनेसाठी नगर परिषद प्रशासनाला केवळ ६५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत मटण - मच्छी मार्के ट, महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई व महिला क्रीडा संकुल या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली. तत्कालीन नगराध्यक्षा उषाताई लवेकर यांच्या कारकिर्दीत ही कामे सुरु झाली. यापैकी महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे काम अंतिम टप्प्यात असून, गेल्या काही महिन्यांपूर्वी या मंडईचे उद्घाटन नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी आमदार रमेश कदम व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, या मंडईचे मूल्यांकनाचे काम रखडल्याने उद्घाटन होऊनही मंडई बंद आहे. मंडईचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिलही अद्याप प्रलंबित आहे.शहरातील बाजारपेठेत मटण व मच्छी विक्रेत्यांना एका छताखाली बसता यावे, यासाठी मटण - मच्छी मार्केट इमारतीचे काम घेण्यात आले. हे कामही गेली ७ ते ८ वर्षे कासव गतीने सुरु आहे. रावतळे (विंध्यवासिनी) या भागात महिला क्रीडा संकुलाचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, हे कामही रखडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत ही कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, ही योजनाच बंद झाल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. अंदाजे साडेतीन कोटींचे हे प्रकल्प असून, एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत केवळ ६५ लाखांचा निधी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधक ठप्प झालेले प्रकल्प कोणत्या योजनेतून मार्गी लावतात, चिपळूण शहरात पालिकेत विकासकामांवर नेहमी धमासान सुरू असते आता काय होणार याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)