शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ चार ग्रामपंचायती निर्मल

By admin | Updated: December 25, 2014 00:04 IST

जिल्हा परिषद : तब्बल ८४ ग्रामपंचायतींची अजूनही योजनेकडे पाठ

रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ मात्र, जिल्हा निर्मल होण्याच्या दृष्टीने पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात लांजा आणि गुहागर हे २ तालुके निर्मल झाले असून, ७ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती अजूनही निर्मल झालेल्या नव्हत्या. त्यासाठी या गावांमध्ये दत्तक-पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, आशा कार्यकर्ती आदींची मदत घेण्यात येणार आहे, असे मागील आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जाहीर केले होते़ जिल्हा निर्मल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख १० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. या प्रत्येक शौचालयासाठी मग्रारोहयोतून ४६०० आणि नरेगामधून ५४०० असे एकूण १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी होते. त्यांच्यापैकी ८५ ग्रामपंचायती निर्मलग्राम पुरस्कारासाठी आॅनलाईन करण्यात आल्या होत्या़या ग्रामपंचायती निर्मल व्हाव्यात, यासाठी तेथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळाही घेण्यात आली होती़ या कार्यशाळेच्या माध्यमातून निर्मलग्रामसाठी प्रबोधन करण्यात आले होते़दरम्यान, जिल्ह्यातील निर्मल ग्राम न झालेल्या ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आली होती़ या समितीने जिल्ह्यात दौरा करुन ग्रामपंचायतींची तपासणी केली होती़ त्यानंतर नुकताच राज्यातील ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़जिल्ह्यातील आखणी काही ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ मात्र, अपेक्षा भंग झाल्याने जिल्हाभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींपैकी ७५६ ग्रामपंचायती यापूर्वीच निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये आणखी ४ ग्रामपंचायतींची भर पडल्याने त्यांची संख्या ७६० झाली आहे़ (शहर वार्ताहर)योजनेची ऐशीतैशीतालुकाग्रामपंचायतींची संख्यामंडणगड१दापोली१६खेड१७चिपळूण२७संगमेश्वर७रत्नागिरी९राजापूर८एकूण८५