शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

गाेळवली येथे पकडल्या जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील गोळवली टप्पा येथे जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात संगमेश्वर पोलिसांना ...

आरवली :

संगमेश्वर तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील गोळवली टप्पा येथे जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. गाडीत एकूण सात बैल व सहा पाडे अशी तेरा जनावरे दाटीवाटीने कोंबून विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे तुरळवरून सिंधुदुर्गकडे जनावरे घेऊन तीन टेम्पो रवाना होणार असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी पहाटे तीन वाजता गोळवली टप्पा (ता. संगमेश्वर) येथे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून हे तिन्ही टेम्पो पकडले. यावेळी बोलेरो पिकअप (एमएच ०८ डब्लू ३४३०), अशोक लेलँड दोस्त टेम्पो (एमएच ०७ पी ३२३७) व टेम्पो (एमएच ०७ पी ३१०८) यातून सात बैल व सहा पाडे दाटीवाटीने भरून विनापरवाना घेऊन जात हाेते.

तीन वाहनांसह अनिल काळू तावडे (२५), सुनील काळू तावडे (२७, दाेघे राहणार तुरळ, हरेकरवाडी), कृष्णा धोंडू निकम (४२), गणेश रमेश निकम (२२, दाेघे रा. कणकवली), प्रसाद रामा निकम (२६, रा. फोंडा) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत.