शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

..तर रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाइ

By admin | Updated: March 3, 2015 22:18 IST

चिपळूणची वाहतूक कोंडी : नगर परिषद, पोलिसांकडून संयुक्त बैठर्क

चिपळूण : सध्या शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्यादृष्टीने पोलीस यंत्रणा व नगर परिषद यांच्या सहकार्याने शहरातील हातगाड्या हटवण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने नुकत्याच झालेल्या रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे. नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना देण्यात आली आहे.शिवाजी चौक ते मुख्य बसस्थानक रस्त्यावर उभ्या असणाऱ्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहर परिसरात हातगाडी हटाव मोहीम राबवण्यात आली. बाजारपेठेतील वाहतुकीला अडथळा होणाऱ्या हातगाड्याही हटवण्यात आल्या. त्यामुळे सध्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास टाकला आहे.शिमगोत्सवादरम्यान बाजारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलीस यांच्या मदतीने शहरातील पोलीस चौकी येथे रिक्षा व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांना पोलीस यंत्रणेतर्फे काही सूचना करण्यात आल्या आहे. मुख्य रस्त्यावर जास्त वेळ रिक्षा उभी करु नये, रिक्षा थांब्या व्यतिरिक्त कोणीही अन्य ठिकाणी रिक्षा उभी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. एखाद्या ठिकाणी अधिकवेळ एक रिक्षा उभी असेल तर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. रिक्षा व्यावसायिकांनी पोलीस यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य केल्यास बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी दूर होण्याच्यादृष्टीने मदत होणार आहे. रिक्षा व्यावसायिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले आहे. रिक्षा व्यावसायिकांनी काही समस्याही वाहतूक पोलिसांसमोर मांडल्या. या सूचनेनंतर आता वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष दिले जात आहे. (वार्ताहर)