शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचारची वातानुकूलन यंत्र अस्वच्छ

By admin | Updated: July 15, 2014 00:16 IST

यंत्रात बिघाड झाल्याचे कारण

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी दूरध्वनी केंद्राच्या वातानुकूलन यंत्राची सुरक्षा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दरम्यान, बीएसएनएल मोबाईल सेवा कोलमडल्यानंतर मात्र यंत्रे बिघडल्याची कारणे सांगितली जात असल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.काही महिन्यांपूर्वी शृंगारतळी येथे बीएसएनएलची थ्रीजी सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात इंटरनेटचा वेग वाढला आहे. मात्र, शृंगारतळी येथे बीएसएनएलव्यतिरीक्त टाटा डोकोमो, एअरटेल, आयडिया, वोडाफोन या खासगी कंपन्यांच्या मोबाईल सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांपेक्षा उत्तम सेवा देण्यासाठी सरकारी सेवेला तत्पर राहण्याची गरज आहे. आगामी काळात आणखीन एक कंपनी मार्केटमध्ये उतरत आहे. एखादी नवीन कंपनी आली की, सरकारी ‘रेंज’ आपोआप गायब होण्यास सुरूवात होते.बीएसएनएल सेवा बंद असल्याची विचारणा केल्यास यंत्रात बिघाड झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बीएसएनएल शृृंंगारतळी दूरध्वनी केंद्राच्या वातानुकूलन महागड्या यंत्राच्या देखभाल व सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे. या भागात असलेल्या बीएसएनएलच्या सेवेबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. आता वातानुकूलन अस्वच्छ झाले. (वार्ताहर)