शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकदिनीच शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

वाटूळ : कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदांवरील शिक्षकांनी अनेकदा निवेदने, आझाद मैदानात आंदोलने करूनही शासनाकडून ...

वाटूळ : कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदांवरील शिक्षकांनी अनेकदा निवेदने, आझाद मैदानात आंदोलने करूनही शासनाकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडलेले नाही. १०/१५ वर्षे विनावेतन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने हतबल झालेल्या शिक्षकांनी शिक्षकदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्षण संचालक आणि शिक्षक आमदारांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सन २००३ ते २०११ दरम्यानची व्यपगत पदे, २०१०/११ पूर्वीची उपसंचालक कार्यालयातील नजरचुकीने मान्यता राहिलेली वाढीव पदे आणि २०११ पासूनची वाढीव पदे अशा एकूण १२९८ पदांचा प्रस्ताव मागील अनेक वर्षे शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या पदांवर कार्यरत शिक्षकांना मागील १०/१५ वर्षे पूर्णतः विनावेतन काम करताना एकेक दिवस कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अशक्य झाले आहे. आपल्या पदांना मान्यता मिळेल या भोळ्या आशेवर हे शिक्षक विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करीत आहेत.

शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागवून मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये होत असलेल्या वेळकाढूपणाला कंटाळून हतबल झालेल्या वाढीव पदावरील शिक्षकांनी २६ जुलै रोजी संचालक कार्यालयात एकत्र येऊन १५ ऑगस्ट रोजी आपल्या समस्येकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे, तसेच दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढीव पदांना मान्यता मिळाली नाही, तर दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिनी वाढीव पदावरील शिक्षक नाइलाजाने आत्मदहन करणार असल्याचे म्हटले आहे. या अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाने त्वरित वाढीव पदांना मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षकांनी केली आहे