शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीभर राड्याचीच चर्चा...

By admin | Updated: December 25, 2014 00:06 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : शासकीय कार्यालयासमोर असा प्रकार शांततेला बाधाच

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी दोन गटात राडा झाला. प्राणघातक हल्ला झाला. हत्याराचा स्वैर वापर झाला. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जो काही प्रकार घडला, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असा प्रकार प्रथमच घडला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, यासाठी कठोर कारवाई होण्याची मागणी आता जनतेतूनच होत आहे. पूर्ववैमनस्यातून साळवी स्टॉप येथील एका हॉटेलमध्ये २१ डिसेंबर २०१४ रोजी राडा झाला होता. बाटल्या फोडणे, मारहाण करणे असे प्रकार झाले होते. परंतु त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले. तरीही नंतर हल्लागुल्ला करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. जामीन प्रक्रिया झाल्यानंतर पाचही आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या पूर्ततेसाठी तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी यांच्याकडे बोलावण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही गटात हा प्रकार पोलीस आणि तहसीलदार यांच्या समोर घडला आहे. मुळातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे तहसील कायालय आहे. याठिकाणी प्रांत कार्यालयही आहे. येथे दररोज विविध कामांसाठी तालुक्यातील लोकांची सतत ये-जा सुरू असते. दुपारच्या वेळी तर याठिकाणी अधिकच गर्दी असते. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तहसीलदारांकडून बोलावण्यात आल्यानंतर संबंधित आरोपी व त्यांच्याविरोधातील जो काही गट होता, यांनी आपण न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आहोत, याचे भान ठेवून वागणे आवश्यक होते. जे काही वैमनस्य होते त्यावरून राडा करण्याचे तहसील कार्यालय परिसर हे ठिकाण नव्हते. त्यामुळे ज्या कार्यालयांमध्ये न्यायाची वा न्यायासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रक्रिया होते, अशा ठिकाणी गुन्ह्यात संशयित असलेल्या, कारवाईत नावे असलेल्या व्यक्तींनी कायद्याची आब राखूनच वर्तणूक ठेवायला हवी, हे सांगण्याची गरज नाही. किंबहुना अशा लोकांनीच नव्हे; तर शासकीय कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांनीही हे संकेत पाळणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)ही घटना पहिली अन् शेवटची ठरावी...जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहेच परंतु जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या आवाराचे कायदेशीर पावित्र्य कलंकित करणारी आहे. त्यामुळे घडलेली ही घटना त्या ठिकाणची पहिली व शेवटची असायला हवी. त्यामुळेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिसांनीही अत्यंत कडक अशी भूमिका घेत कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.