शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

युतीला स्वबळाची खुमखुमी

By admin | Updated: November 3, 2016 00:30 IST

काँग्रेसची नाईलाज आघाडी : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लक्ष्य ठेवून मुख्य पक्ष रणांगणात

 रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष नगर परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यासाठीच शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वबळ आजमावत आहेत आणि आतापर्यंत अनेकदा ठेचकाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र आघाडी करण्याचे शहाणपण दाखवले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये दरी पडली. ती नंतर वाढतच गेली आहे. आताच्या घडीला राज्यस्तरावर युतीचा निर्णय झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र युती करण्याबाबतची चर्चाही दोन्ही पक्षांनी केलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना सर्वात ताकदवान आहे. संख्याबळाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, तिसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. आजवर शिवसेना-भाजपने सर्वच निवडणुका युती म्हणून लढवल्या आहेत. त्यामुळे १९९५पासून बहुतांश ठिकाणी युतीचेच प्राबल्य राहिले आहे. युतीला मिळालेले हे यश ‘युती’ म्हणूनच मिळाले आहे. ज्यावेळी युतीमध्ये फारकत झाली तेव्हा दोन्ही पक्षांना थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे. त्यातही भाजपला अधिक फटका बसला आहे. गुहागर विधानसभा मतदार संघात भाजपची हक्काची जागा राष्ट्रवादीकडे गेली ती फिस्कटलेल्या युतीमुळेच. रत्नागिरीत भाजपची जागा शिवसेनेला गेली ती फिस्कटलेल्या युतीमुळेच. युती नसल्याने भाजपला हे दोन माठे फटके बसले आहेत. मात्र तरीही भाजपचा स्वबळ आजमावण्याचा अट्टाहास कायम आहे. आताच्या निवडणुकांमध्ये राज्यात युती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला असला तरी युती करण्याबाबत जिल्हास्तरावर आवश्यक तो निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात युती करण्याबाबत कोणतीही चर्चाच झाली नाही. भाजप सोबत असताना शिवसेनेची ताकदही मोठी होती. आजच्या घडीला शिवसेनेचा वरचष्मा असला तरी भाजप साथीला नसल्याने ताकद कमी झाली आहे. पण शिवसेनेनेही युती करण्यामध्ये स्वारस्य दाखवलेले नाही. नगर परिषद निवडणुका संपल्यानंतर तीन महिन्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून नगर परिषद निवडणुकांकडे पाहिले जात आहे. आपली ताकद किती आहे, याचा अंदाज दोन्ही पक्ष घेत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. युतीच्या उलट स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची झाली आहे. १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसना मोठा फटका बसला. त्या फटक्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणुका या दोन्ही पक्षांनी आघाडीने लढवल्या आहेत. या दोन्ही पक्षांना स्वबळ आजमावण्याचे दुष्परिणाम भोगावे लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी शहाणपणाने विचार सुरू असून, या निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. चिपळूण नगर परिषद वगळता जिल्ह्यातील उर्वरित चारही ठिकाणी दोन्ही काँग्रेस आघाडीनेच निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे आघाडीला कळलेले गणित युती मात्र अजून उमगलेले नाही, असेच चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी) युती नेमकी नकोय कोणाला? जिल्ह्यात आजवर शिवसेना-भाजपला जे मोठे यश मिळाले, ते युतीमुळे मिळाले. युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांना काही ना काही परिणाम भोगावे लागले आहेत. मात्र तरीही युती करण्याबाबत चर्चाही झालेली नाही. त्यामुळे युती नेमकी नकोय कोणाला, ही चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून युती तुटण्यासाठी एकमेकांवर आरोप केले जात आहेत.