शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
3
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
4
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
5
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
6
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
7
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
8
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
9
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
10
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
11
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
12
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
13
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
14
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
15
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
16
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
17
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'
18
‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा
19
'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना
20
२७ किमी माइलेज, सनरूफसह ६ एअरबॅग्स; लवकरच लॉन्च होणार TATA ची SUV कार, किंमत आहे...

दुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

देवरुख : कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात ...

देवरुख : कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मुंबई-गाेवा महामार्गावरील सोनवी चौक येथे मंगळवारी घेराओ घातला.

जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. याउलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. मंगळवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आणि तहसीलदार सुहास थोरात संगमेश्वरात बुरंबी येथे कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली. संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराओ घालत जाब विचारला. यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर यांनी व्यापाऱ्यांची होणारी फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले.

यावेळी बोलताना फारूक पठाण म्हणाले की, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संयमी आहेत. मात्र, आता संयमाचा अंत झाला आहे. बुधवारपर्यंत निर्णय द्या, नाहीतर गुरुवारपासून दुकाने उघडतो, असे सांगितले. यावेळी व्यापारी संघाचे सचिव अनिल भिडे म्हणाले की, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी कधीही आंदोलन केले नाही. मात्र, आंदोलन करण्यास भाग पाडू नका, असे सांगितले़

----------------------

अन्यथा गुरुवारपासून बाजारपेठ सुरू

व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीचा पाढा वाचत बाजारपेठ सुरू करा, दुकाने उघडायला परवानगी दिली नाही तर गुरुवारपासून व्यापारी स्वतः दुकाने उघडतील. प्रशासनाने कारवाई केल्यास कारवाईला सामोरे जायला सर्व व्यापारी एकजुटीने तयार आहेत. अशा प्रकारचे निवेदन व्यापारी संघातर्फे यावेळी देण्यात आले़

फोटो : तहसीलदार सुहास थोरात यांना निवेदन देताना संगमेश्वर व्यापारी