शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

गांडूळ खत प्रकल्प देतोय महिलांना आधार

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

गुहागर तालुक्यातील असगोली येथील स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत स्थापन झालेल्या श्री व्याघ्रांबरी महिला

स्वयंसहाय्यता बचत गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. बचत गटाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून गटातील महिलांसह परिसरातील महिलांनाही रोजगार मिळवून दिला आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दारिद्र्यरेषेखालील आदर्श सक्षम स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराची योजना जाहीर झाली आणि या योजनेंतर्गत गुहागर तालुक्यातील असगोली येथील या बचत गटाला सन २००७-०८ साली तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर सन २००८-०९ यावर्षी कोकण विभागस्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. बचत गटाची स्थापना १ जानेवारी २००४ला झाली. बचत गटामध्ये एकूण दहा महिला आहेत. अध्यक्ष सुजाता कावणकर, सचिव अनिता कावणकर, सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, अश्विनी पानगले, तारामती पानगले, राधिका घाणेकर, रंजना कावणकर, वंदना कावणकर आदी महिला सदस्य आहेत. अशिक्षित किंबहुना सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या महिला एकजुटीने अनेक कामे करत आहेत.दरमहा नियमित सभा होतात. सभेला ९० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असते. मासिक वर्गणी दरमहा जमा केली जाते. या पैशातून कर्जव्यवहार करुन घरगुती अडचणींबरोबर शौचालय बांधण्याचे उपक्रम राबवले जातात. बचत गटाच्या प्रारंभी दरमहा २५ व नंतर ५० रुपये अशी वर्गणीत वाढ होत गेली. वर्गणीची आजअखेर ५७ हजार एवढी रक्कम जमा आहे. खेळते भांडवल म्हणून २५ हजार रक्कम प्राप्त झाली आहे. २२ आॅक्टोबर २००५ला द्वितीय मूल्यांकन झालेल्या या बचत गटाला ९ नोव्हेंबर २००५ रोजी बँक आॅफ इंडिया गुहागरमार्फत १ लाख ६० हजार व त्यानंतर ४० हजार असे एकूण २ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त झाले.३१ डिसेंबर २००५ ला गांडूळ खत प्रकल्पाला सुरुवात केली. आजपर्यंत ९ वर्षात २२२ टन गांडूळ खताची विक्री करण्यात आली. त्यातून १४ लाख ५६ हजारांचे उत्पन्न झाले आहे. बचत गटातील सदस्यांनी ५६५० दिवस काम करुन ३ लाख ३९ हजार रुपयांचा रोजगार मिळवला, तर गटाबाहेरील महिलांना १ हजार २३० दिवस असा एकूण ७३ हजार ८०० रुपयांचा रोजगार दिला आहे. एकूण ४ लाख १२ हजार ८०० रुपयांची मजुरी बचत गटातून निर्माण झाली. प्रारंभी ५ रुपये किलोपासून १० रुपये किलोपर्यंत गांडूळ खत विक्री केली जात आहे.एवढ्यावरच न थांबता या महिलांचा गटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातही सहभाग असतो. यामध्ये ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग, आरोग्यविषयक शिबिर घेणे, जलसंधारणांतर्गत बंधारा बांधणे, गणपती विसर्जनावेळी निर्माल्य गोळा करुन त्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाते. चारसूत्री भात लागवड कार्यक्रम राबवून तब्बल ५० टन भाताचे उत्पादन वाढवले आहे. ग्रामसभा व महिला ग्रामसभा, कृषी शिबिर यातून आवर्जुन उपस्थिती असते. बचत गट निर्माल्याच्या वेळी तत्कालीन कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर व सहकारी अधिकाऱ्यांनी या बचत गटाला सर्वतोपरी मार्गदर्शन केले. त्यानंतर बचत गटाच्या वाटचालीमध्ये संबंधित सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन केल्याने बचत गटाने भरारी घेतली आहे.- संकेत गोयथळेबचत गटाबाहेरील महिलांनाही रोजगारअसगोली येथील या बचत गटासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. अखेरीस या महिलांनी खंबीरपणे उभे राहून गांडूळ खत प्रकल्प राबवण्याचा पर्याय स्वीकारला. गांडूूळ खताचा प्रकल्प राबवताना सुरुवातीला छोटा प्रकल्प राबवला. मात्र, त्यानंतर हळूहळू गांडूळ खताबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीही होऊ लागली आणि त्यामुळे गांडूळ खताला मागणी वाढू लागली. २००५ साली सुरू झालेला हा प्रकल्प अजूनही सुरू आहे. एवढंच नव्हे तर बचत गटाबाहेरील महिलांनाही तो रोजगार देऊ लागला आहे.बचत गटामुळे वारंवार संबंधित सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत आदी ठिकाणी जावे लागत होते. यामधून आत्मविश्वास वाढला. असगोली गावापुरते मर्यादित असलेले आमचे जग वाढून ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या.- सुजाता कावणकर,अध्यक्षाआम्हाला स्वत:च्या व्यवसायातून पैसे मिळू लागले आहेत. पूर्वी मजुरी करुन दुसऱ्यांच्या मताप्रमाणे काम करावे लागत होते. बचत गटाच्या माध्यमातून आत्मविश्वास प्राप्त होऊन जगण्याचे एक नवे ध्येय मिळाले. हा एक व्यवसाय असल्याने गांडूळ खताचा दर्जा कधीही घसरु देत नाही.- अनिता कावणकर, सचिवआधारवड