शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या विकेंड लॉकडाऊनमुळे गुरुवारी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. यानिमित्ताने शहर व परिसरात पोलीस ...

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या विकेंड लॉकडाऊनमुळे गुरुवारी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. यानिमित्ताने शहर व परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वच दुकाने व व्यवसाय बंद असल्याने बाजारपेठ सुनीसुनी झाली होती. तरीही काही दुचाकीस्वार व वाहनधारक अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली बाहेर पडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

संचारबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने आधीच केले होते. तसेच नगर परिषदेनेही शहरात रिक्षा फिरवून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना व नागरिकांना दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊन विषयी आवाहन केले होते. त्याला गुरुवारी येथील व्यापारी व नागरिकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बाजारपेठेत मेडिकलचे दुकान वगळता अन्य सर्व दुकाने बंद होती.

या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील लॉकडाऊन प्रमाणे शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटस उभारून सर्व सीमा सील केल्या आहेत. तसेच शहरातील उक्ताड, नाईककंपनी बजारपूल, फरशी तिठा, चिंचनाका, पाग देसाई बाजार, बहाद्दूर शेख नाका या ठिकाणी तंबू उभारुन पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

दुपारच्या वेळी काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडल्याने त्यांच्यावर कारवाई केली. विशेषतः चिंचनाका येथे १५ हून अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

--------------------------------

चिपळूण शहरातील नेहमी गजबजणारा व गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखला जाणारा बाजारपेठेतील चिंचनाका परिसर लॉकडाऊनमुळे सुनासुना झाला आहे़