शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

पथदीप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पथदीप सध्या बंद आहेत. वीजबिलाची रक्कम वेळेवर न भरल्याने पथदीप बंद करण्यात ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पथदीप सध्या बंद आहेत. वीजबिलाची रक्कम वेळेवर न भरल्याने पथदीप बंद करण्यात आल्याचे महावितरणकडून या ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने अद्याप बिले न भरल्याने पथदीप बंदच आहेत.

जीर्ण वृक्ष तोडावेत

शिरगाव : कऱ्हाड - चिपळूण मार्गावरील पोफळी सय्यदवाडी येथील अब्बास सय्यद यांच्या घरासमोर सुकलेले जीर्ण झाड धोकादायक बनले आहे. हे झाड पडल्यास दुर्घटना होण्याचा धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड तोडावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोविड सेंटरला देणगी

साखरपा : येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये १९८९-९० या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी इथल्या कोविड केअर सेंटरला ३० हजार रुपयांची मदत केली. माजी विद्यार्थी तथा देवरुख पंचायत समितीचे सभापती जया माने यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे ही देणगी सुपूर्द करण्यात आली.

कोरोना चाचणीला विलंब

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. परंतु, या चाचण्यांचे अहवाल मिळण्यासाठी विलंब होत आहे. या चाचण्या करणारे अहवाल येईपर्यंत घरात थांबून न राहता इतरत्र फिरत राहतात. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग सर्वत्र फैलावत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे.

भात लावणीला वेग

सावर्डे : चिपळूण तालुक्यात शेतीची कामे आता वेगात होऊ लागली आहेत. योग्यवेळी पेरणी केल्याने रोपांची योग्य वाढ झाली आहे. त्यामुळे भात लावणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सुरुवातीचा पाऊस चांगला झाल्याने ८ ते १० दिवसातच रोपे तरारुन आली असून, लावणी उरकण्यासाठी शेतकरी घाई करत आहेत.

फणस कलमांचे वाटप

चिपळूण : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत, कळंबस्ते येथे कृषी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत इमारत परिसरात लागवड करण्यात आली. यावेळी नारळ तसेच फणस कलमांचे वाटप शेतकरी कुटुंबांना करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती शौकत मुकादम, सरपंच विकास गमरे तसेच कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

औषधी वनस्पतींची लागवड

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. औषधी वनस्पतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व लक्षात यावे, या हेतूने दरवर्षी औषधी वनस्पतींची लागवड केली जाते.

उद्यानात शुकशुकाट

रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, उद्योग तसेच सार्वजनिक ठिकाणेही बंद आहेत. मुलांची रमण्याची ठिकाणे असलेली उद्यानेही पुन्हा बंद आहेत. त्यामुळे बालकांअभावी ही उद्याने सुनसान झाली आहेत. अनेक दिवस बंदस्थितीत राहिल्याने या उद्यानातील खेळण्यांचीही दुरवस्था झाली आहे.

छोट्या मूर्तींना मागणी

लांजा : शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने गणेशोत्सवासाठी नियमावली घालून दिली आहे. त्यानुसार यावर्षीही छोट्या मूर्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षीही तालुक्यात छोट्या गणेशमूर्तींना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. मूर्तीशाळांमध्ये आता कलाकारांची लगबग सुरु झाली आहे.

पावसाची दडी

गुहागर : यावर्षी तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे बळीराजाने शेतीच्या कामाला उत्साहाने सुरुवात केली होती. पेरण्याही वेळेत झाल्या होत्या. पाऊस चांगला पडत असल्याने नांगरणीलाही सुरुवात केली होती. परंतु, जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे पुन्हा लावणीच्या कामाचा खोळंबा झाला आहे.