शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सॉरी पप्पा, मी आईकडे जातोय!; लांजातील तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 05:34 IST

आठ वर्षापूर्वी आईच्या मृत्यूचा धक्का अजूनही मनावर कायम असलेल्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली.

लांजा (जि.रत्नागिरी) : आठ वर्षापूर्वी आईच्या मृत्यूचा धक्का अजूनही मनावर कायम असलेल्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. विनय चंद्रकांत जाधव (२६ रा. हर्दखळे, ता.लांजा) असे या तरूणाचे नाव आहे. ‘सॉरी पप्पा, मी आईकडे जातोय’, अशी चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.विनयच्या आईने आठ वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचा विनयला खूप धक्का बसला होता. त्यानंतर विनयला त्याच्या वडिलांनी मुंबई येथे नेले. तेथे एका खासगी कंपनीत तो काम करत होता. बुधवारी तो हर्दखळे येथे आला. त्या रात्री ९.३० वाजता त्याने घराचा दरवाजा लावून घेतला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरात कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याला हाका मारल्या. मात्र, आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे वाडीतील ग्रामस्थांनी दरवाजावरील खिडकीतून पाहिले असता गळफास लावून घेतल्याचे दिसले. तत्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पंचनामा करताना पोलिसांना विनयने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ‘साँरी पप्पा, मला आता सहन होत नाही आहे. मम्मी गेली आहे तिथे मी जात आहे. जशा मम्मीच्या वस्तू सांभाळून ठेवल्या आहेत, तशाच माझ्या वस्तूही सांभाळून ठेवा‘, असे विनयने चिठ्ठीत लिहिले आहे.