शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा हाेणार हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्यानजीकची जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी काही रक्कम पालिकेकडून शासनाकडे जमा ...

राजापूर :

राजापूर शहरातील मुख्य रस्त्यानजीकची जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी काही रक्कम पालिकेकडून शासनाकडे जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेला १७ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा नगरोत्थानमधून मंजूर झाला असून, या निधीतून संबंधित रक्कम शासनाकडे लवकरच जमा केली जाणार आहे. त्यामुळे रखडलेले जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचे हस्तांतरण आता मार्गी लागणार आहे.

शहरातील राजापूर हायस्कूलच्या समोर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. त्याचे नगरपालिकेतर्फे व्यवस्थापन केले जात होते. मर्यादित उत्पन्न असलेल्या ‘क’ वर्गीय पालिकेला त्यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा खर्च पेलवणार नसल्याने ही जागा व इमारत १९८८ मध्ये शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे १४ गुंठे जागेसह दवाखाना इमारत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतींचे हस्तांतरण करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आरोग्य विभागातर्फे सुरू झाला.

मात्र, काही वर्षांनंतर जीर्ण झालेली ही इमात ढासळून धोदाकायक बनली होती. पावसाळ्यात इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली होती, तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला होता. याचदरम्यान ग्रामीण रुग्णालयासाठी नवी इमारत मंजूर होऊन त्यासाठी सुमारे २ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातून मुख्य रस्त्यालगत न्यायालयाच्या समोर रूग्णालयाची अद्ययावत इमारत आणि अधिकारी, कर्मचारी यांचे निवासी संकुल उभारण्यात आले. या नव्या इमारतीमध्ये २००७ साली ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाल्यापासून जुनी रुग्णालयाची इमारत व जागा वापराविना पडून आहे.

शहर विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेली ही जागा हस्तांतरित व्हावी, अशी मागणी पालिकेने शासनाकडे वारंवार केली हाेती. माजी आमदार हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन जागा हस्तांतरणासाठी शासनाकडे जमा करावयाच्या रकमेसाठी लागणारा १७ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्हा नगरोत्थानमधून मंजूर झाला आहे. हा निधी लवकरच शासनाकडे जमा केला जाणार आहे. त्यानंतर, ही जागा पालिकेकडे हस्तांतरित होणार आहे.