शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत कोरोना लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

जिल्हा युवा सेनेची ऑनलाइन बैठक खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा युवा सेनेची ऑनलाइन बैठक युवा सेना सचिव सूरज चव्हाण, ...

जिल्हा युवा सेनेची ऑनलाइन बैठक

खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा युवा सेनेची ऑनलाइन बैठक युवा सेना सचिव सूरज चव्हाण, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी केली. तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट देण्याची मागणी केली.

कोरोनाविषयी जनजागृती

खेड : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील पोलीसस्थानक अंतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्र येथील पोलिसांनी लोटेतील झोपडपट्टीवासीयांना कोरोनाविषयी मार्गदर्शन केले. याचवेळी हँडवॉश, सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. काेराेनाचा संसर्ग न हाेण्यासाठी काेणती काळजी घेतली पाहिजे याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

शिव प्राथमिक केंद्रात मास्कचे वाटप

खेड : तालुक्यातील शिव प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस संदीप फडकले यांच्या माध्यमातून सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोव्ह्जचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील शेल्डी, मेटे, असगणी, शिव, कोतवली, आयनी, सात्विनगाव, सोनगाव, कुंभाड या ठिकाणीही वाटप करण्यात आले.

खेडमध्ये २,२८० रुग्णांची कोरोनावर मात

खेड : एकीकडे तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह अन्य प्रशासकीय यंत्रणा सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. आतापर्यंत २,२८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ५०, घरडा कोविड सेंटरमध्ये ४८, नगर परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये २१, तर शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरमध्ये ४७ रुग्ण उपचार घेत आहेत.