शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात कोरोना लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

गुहागर : तालुक्यातील ७ लसीकरण केंद्रांतून लसीकरण सुरू आहे. वाढत्या कोरोनामुळे लसीकरणासाठी ग्रामस्थांची गर्दी वाढत असतानाच केवळ आजच्या दिवस ...

गुहागर : तालुक्यातील ७ लसीकरण केंद्रांतून लसीकरण सुरू आहे. वाढत्या कोरोनामुळे लसीकरणासाठी ग्रामस्थांची गर्दी वाढत असतानाच केवळ आजच्या दिवस पुरेल एवढेच लसीकरणाचे डोस तालुका आरोग्य विभागाकडे असल्याने बुधवारपासून लसीकरण बंद ठेवावे लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गुहागर तालुक्यात तळवली, चिखली, आबलोली, कोळवली, हेदवी ही पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेळंब उपकेंद्र व गुहागर ग्रामीण रुग्णालय अशा सात केंद्रांतून लसीकरण होत आहे. सुरुवातीला केवळ दोनच केंद्रे होती. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणखी ५ केंद्रे वाढविण्यात आली आहेत. ६० वर्षांपुढील लोकांसाठी तसेच ४५ ते ६० वयोमर्यादेमधील लोकांना दुर्धर आजार असेल तरच लस दिली जात होती. हा निकष बदलून सरसकट ४५ वर्षांपुढील सर्वांनाच लस दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने लस घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळेही भीतीपोटी अनेकजण पुढे होऊन लस घेण्यासाठी येत आहेत.

तालुक्यात सुरुवातीच्या काळात कोव्हॅक्सिनचा १४३४ लोकांनी डोस घेतला तर कोव्हिशिल्डचा ३०८३ लोकांनी पहिला डोस तर ७५७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. टप्प्याटप्प्याने शासनाकडून लसीकरण केंद्रावर लसीचा पुरवठा होत आहे. मात्र, गेले दोन दिवस आवश्यक लस पुरवठा न झाल्याने आजच्या दिवशी पुरेल एवढाच लस साठा केंद्रावर उपलब्ध आहे.

मंगळवारी लसअभावी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. बहुतांशी केंद्रावर लसीचा साठा संपतो आहे हे लक्षात येताच आज सकाळी तातडीने दापोली येथून १५० लस साठा गुहागर तालुक्यासाठी देण्यात आला. मात्र, जिल्ह्यात लस साठा संपत चालल्याने बुधवारपासून लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.