शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शबाना वस्ता यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

सुर्वे यांचा सत्कार रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सत्कार ...

सुर्वे यांचा सत्कार

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, रत्नागिरी पक्षप्रतोद सुदेश मयेकर उपस्थित होते.

विशेष भत्त्याची मागणी

रत्नागिरी : मालवाहतूक करणाऱ्या चालकांना येणाऱ्या समस्या विचारात घेऊन त्या तातडीने दूर कराव्यात, चालकांना मुक्कामासाठी लागणारा वेळ, नाष्टा, जेवणाची गैरसोय विचारात घेऊन कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रुपये विशेष भत्ता देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

दापोली : येथील अनुबंध संस्थेतर्फे खानबहाद्दूर मेमोरिअल हॉस्पिटलला गरीब व गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. हे यंत्र कसे चालवावे, याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यावेळी डॉ. अनिरुद्ध डोंगरे, वरूण वालावलकर, ओंकार कर्वे, डॉ. मुनीर सरगुरोह उपस्थित होते.

एटीएम सेवा कोलमडली

देवरूख : चक्रीवादळामुळे संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील यंत्रणा कोलमडली होती. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, वीजपुरवठाही सुरळीत झाला आहे. मात्र, बँकांची एटीएम सेवा मात्र अद्याप कोलमडलेली आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची गैरसोय होत आहे.

साहित्य वाटप

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीतर्फे गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे. सरपंच शेखर आकटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष जामसंडेकर उपस्थित होते.

कोरोना केंद्राला मदत

देवरुख : येथील जुने तहसील कार्यालय येथे कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील रुग्णचाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ३०० लीटरची पाण्याची टाकी, रुग्णांना बसायला बाकडी, पंखे व विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निकष बदलण्याची मागणी

देवरुख : आंबा बागायतदारांच्या शिष्टमंडळाने मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन नुकसानभरपाईचे शासकीय निकष बदलण्याची मागणी केली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी हा प्रश्न राजदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरचिटणीस मनोज चव्हाण, वैभव खेडेकर, सुनील साळवी उपस्थित होते.

इंजिनियर नियुक्तीची मागणी

रत्नागिरी : रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वॉर्डसाठी पाईपलाईनसह इतर सर्व उपकरणे, साधन सामुग्री निकृष्ट दर्जाची वापरली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये बायोमेडिकल, इंजिनिअर नियुक्तीची मागणी करण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती वाटप

मंडणगड : तालुक्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत शिष्यवृत्ती अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद आदर्श शाळा, वाल्मिकीनगर येथे एकूण १४ मुलींना याचा लाभ देण्यात आला. प्रत्येकी ३०० रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक अमरदीप यादव, प्रशिक्षक विश्वनाथ जाधव, सुवर्णा लोणकर आदी उपस्थित होते.