शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अजित गोरुले यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

संदीप माळवदेचे यश देवरुख : येथील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे याने प्रथम ...

संदीप माळवदेचे यश

देवरुख : येथील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रमेश गोपाळ यांनी द्वितीय, अर्चना मांगले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सृजल टाकळे, माधुरी जोशी, वैष्णवी पारकर, अशोक रनवरे आदींना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.

डांबरीकरण मागणीला यश

रत्नागिरी : डोर्ले खोतमळा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. मागणीला यश आले असून रस्ता डांबरीकरणासाठी जनसुविधेंतर्गत साडेतीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

रस्ता दुरुस्तीची प्रतीक्षाच

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील रस्ते निकृष्ट झाले आहेत. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थी, पालकात संभ्रम

रत्नागिरी : शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत; मात्र याबाबत अद्याप तारखा व वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या सूचनेकडे लक्ष लागून राहिले आहे.

विक्रेत्यांवर संक्रांत

रत्नागिरी : कोकणी मेवा महामार्गावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. आंबे, काजूसह, फणस, करवंदे, जांभळे, जाम विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वत्र शांतता आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

माकडांचा उपद्रव

रत्नागिरी : तालुक्यातील टेभ्ये, चांदेराई, हरचेरी परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. नारळी, आंबा बागायतीसह भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत. काैलारू घरात शिरुन अन्नपदार्थ खाऊन फस्त करीत आहेत. ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

फळांना मागणी

रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, कलिंगड तसेच आंब्यासाठी मागणी होत आहे. रविवारी फळांसाठी मागणी आणखी वाढणार असल्याने विक्रेत्यांनी आधीच स्टाॅक जमा केला आहे.

भूमिगत वाहिनीच्या कामाला वेग

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत आडी ते परटवणे तसेच शहरातील काही भागात भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. सध्या परटवणे ते गांजुर्डे पर्यंत काम जोरात सुरू असल्याने वाहन चालकांना वाहन खबरदारी घेत चालवावे लागत आहे. लाॅकडाऊनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने कामाला गती प्राप्त झाली आहे.

मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

रत्नागिरी : शासनाने कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा तर रद्द केल्या आहेत. अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. शासनाने याबाबत स्पष्ट सूचना जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत आहे.