शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिशान्तरतर्फे युवाशक्तीला एकवीस लाखांची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

- शैक्षणिक साहित्यासह दप्तर, हजारो विद्यार्थ्यांना पुस्तके लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली ...

- शैक्षणिक साहित्यासह दप्तर, हजारो विद्यार्थ्यांना पुस्तके

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यामुळे या मुलांना विपरीत परिस्थितीशी झुंजण्याचे अलौकिक बळदेखील निसर्गतः मिळाले आहे. गावकुसापासून दूरवरच्या वाड्यावस्त्या... त्या साऱ्या अडचणींच्या जंगलवाटा तुडवत शिक्षणासाठी चाललेली पायपीट... यातही कुणी अर्थ दुर्बल तर कुणी कौटुंबिक आधार गमावलेला, अशा साऱ्या देशाच्या भावी आधारस्तंभांना शिष्यवृत्तीतून सहकार्याचा स्नेहार्द हात देण्याचा उपक्रम दिशान्तर संस्थेने सुरू ठेवला असून, त्यायोगे २१ लाखांपेक्षा अधिक रक्‍कम देण्यात आली आहे.

माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहराकडे जाणे, डोनेशन, रोजचा प्रवास वा बाहेरगावी राहण्याचा खर्च अशा साऱ्यामुळे अंगी गुणवत्ता असूनही उच्चशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतात. गावकुसापासून दूरवर राहणाऱ्यांना जंगलवाटा तुडवत शाळेत यावे लागते. शिक्षणासाठी चाललेली पायपीट प्रसंगी सहन होते. दिशान्तर संस्थेला विद्यार्थ्यांची ही व्यथा लक्षात आली होती. यातूनच ज्ञानयज्ञ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. याचे तीन टप्पे आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास पेटी, परीक्षा पॅड, खाऊ डबा, पाणी बॉटल अशा शैक्षणिक साहित्यासह दप्तर देण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखांकरिता क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके पेढी कॉलेजनिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. याच जोडीने काही विद्यार्थ्यांना एस.टी. पासेसही देण्यात आले. ज्ञानयज्ञच्या तिसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी १२९ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे गत चार वर्षांत २१ लाख २ हजारांची रक्‍कम विद्यार्थ्यांना देण्यात दिशान्तरला यश आले आहे.