शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी संजय साळवी

By admin | Updated: November 11, 2014 23:20 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फुटीर गटाचा पाठिंबा

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय साळवी यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीतून बाजूला होत चारजणांनी वेगळा गट करून शहर विकास आघाडी स्थापन केल्याने शिवसेनेला त्याचा फायदा झाला व १७ मते मिळवून साळवी विजयी झाले. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रज्ञा भिडे यांना ११ मते मिळाली.या पदासाठी संजय साळवी व प्रज्ञा भिडे यांनी नामनिर्देशनपत्र प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांना सादर केल्यानंतर छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. दुपारी १२.४५ वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. पालिकेमध्ये शिवसेनेचे १३, भाजपचे ८, राष्ट्रवादीचे ६ व काँग्रेसचा १ असे पक्षीय बलाबल आहे; परंतु राष्ट्रवादीच्या ६ पैकी दत्तात्रय विजय ऊर्फ बाळू साळवी, स्मितल सुरेश पावसकर, प्रीती रवींद्र सुर्वे, मुनीज तन्वीर जमादार या चार नगरसेवकांनी रत्नागिरी शहर विकास आघाडीची स्थापना करून संजय साळवी यांना मतदान केले. त्यामुळे शिवसेना उमेदवार साळवी यांना १७ मते मिळाली. सुदेश मयेकर, सईद पावसकर व मुनज्जा वस्ता यांची तसेच भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांची मिळून एकूण ११ मते प्रज्ञा भिडे यांना मिळाली. राज्यस्तरावर सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू असून, त्याचे प्रत्यंत्तर रत्नागिरी पालिकेमध्ये दिसून आले. शिवसेनेला उपनगराध्यक्षपदापासून वंचित ठेवण्याचा डाव भाजपने आखला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. भाजपचे ८, राष्ट्रवादीचे ६, काँग्रेसचे १, शिवसेनेतील असंतुष्ट २ अशा १७ नगरसेवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, आमदार उदय सामंत यांचे निकटवर्तीय असलेल्या चार सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून सेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपच्या पदरी निराशा आली. पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावला होता. मात्र, पक्षादेश धुडकावत चार नगरसेवकांनी स्वतंत्र आघाडी केली व सेनेच्या बाजूने मतदान केले. (प्रतिनिधी)तांत्रिक बाबींमुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी यांना तसे पत्रही सादर करण्यात आले आहे. शहर विकास आघाडीने सेनेला पाठिंबा दिला असल्याचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहर विकासासाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावला होता. मात्र, पक्षादेश धुडकावत चार नगरसेवकांनी स्वतंत्र आघाडी केली व सेनेच्या बाजूने मतदान केले. स्वतंत्र गट स्थापन केला असल्याने याबाबत माहिती घेणार असल्याचे नगरसेवक सुदेश मयेकर यांनी सांगितले.