शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हातपाटी वाळू उपशाला लवकरच मुभा

By admin | Updated: April 24, 2016 23:23 IST

राधाकृष्णन बी. : देवरूखातील सप्तलिंगी नदीपात्र स्वच्छ करण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यात रॉयल्टीद्वारे हातपाटीने वाळू उपसा करण्याची मुभा दिली जाईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. नदीतील गाळ उपसा करण्यासाठी ग्रामस्थ मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी देवरूख येथील कार्यक्रमात बोलताना केले.सोळजाई मंदिरामध्ये देवस्थानच्या पुढाकाराने पाणी हे जीवन हा उपक्रम हाती घेऊन सप्तलिंगी नदीचे ३ किमी पात्र स्वच्छ करण्याचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला. घाटमाथ्यावर कमी पाऊस पडतो, तरीही तेथे विहिरींचे पुनर्भरण उपक्रम राबवून त्या पाण्याचा मुबलकसाठा करून टंचाईवर मात केली जाते, असाच उपक्रम कोकणातील कातळ जमिनीमध्येसुध्दा राबविणे आवश्यक आहे, मार्गदर्शन करताना राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.हा उपक्रम राबवून देवस्थानने चांगला निर्णय घेतला आहे, अशाच प्रकारे जिल्ह्यातील गावागावात असलेली नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून मंडळांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजना लोकसहभागाच्याच आहेत. यातून अनेक फायदे होऊ शकतात, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. खाडीच्या मुखाशीही खाड्यांची पात्र गाळात रूतली आहेत. यासाठीही रॉयल्टी भरून हात पाटीद्वारे वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली जाईल, असेदेखील आश्वासन राधाकृष्णन बी यांनी दिले. सोळजाई देवस्थानने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, भविष्यातील पाणीटंचाई दूर करणारा आहे. या चांगल्या उपक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी देवस्थानचे आभार मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी ही मनोगतातून पाणीटंचाईची भीषणता व त्यावरील उपाय नमूद केले. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनीही मनोगत व्यक्त करताना कोकणातील नद्यांची अवस्था व त्यांच्या सफाईची गरज व्यक्त करुन शासनाने याबाबत ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानने सुरू केलेल्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकसहभागातूनच विधायक व विकासाची कामे घडतात, हीच कास धरून सोळजाई देवस्थानने उचललेले पाऊल पाणीटंचाईवर मात करणारे आहे, असे सांगितले. या कार्यक्रमात देवस्थानचे अध्यक्ष शरदचंद्र गांधी यांनी या उपक्रमाची आवश्यकता व देवरूख नदीपात्राची दुरवस्था त्यातूनच जाणवणारी पाणीटंचाई याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या वेळी देवरूखचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, युवानेते रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बोथले, वेदा फडके, उपसभापती प्रमोद अधटराव, तहसीलदार वैशाली माने, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक भारती, कृषी अधिकारी हेमंत तांबे, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष शंकर शेट्ये सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, तालुका कृषी अधिकारी बी. जी. कदम, मुख्याधिकारी शिल्पा नाईक, मनोज जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष लाड यांनी केले. (प्रतिनिधी)