शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१ तारखेला पगार होईना

By admin | Updated: December 5, 2015 00:24 IST

शिक्षकांमध्ये नाराजी : शासन निर्णयाला अजूनही हरताळच

आनंद त्रिपाठी -- वाटूळ--राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षकांचे वेतन एक तारखेला जमा करावे असा शासन निर्णय होऊन तीन महिने उलटले. १ तारखेला पगार न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देशही परिपत्रकामध्ये आहेत. परंतु, रत्नागिरी जिल्ह््यात शहरी भागातील काही शाळा सोडल्या तर अनेक शाळांमधील वेतन हे ५ किंवा ६ तारखेला होत असल्याने शासनाच्या परिपत्रकालाच हरताळ फासला जात आहे.शासनाकडून कोषागार कार्यालयाकडे वेळेत बिले सादर केली जात असून, १ तारखेलाच प्रत्येक विभागातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये आॅनलाईन वेतनाची रक्कम गेले तीन महिने जमा होत आहे. परंतु, संबंधित शाळेतील शिक्षकांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागत असल्याने १ तारखेला जमा झालेली पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांना ५ किंवा ६ तारखेला मिळत आहे. या विलंबाला केवळ जिल्हा मध्यवर्ती बँक हीच कारणीभूत असल्याने जिल्ह््यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत व्हावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे.शासनाने केवळ निर्णय घेतला मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.वेतनाची रक्कम ही आॅनलाईन जमा होते. परंतु, प्रत्येक शाळेची पे बिले जिल्हा बँकेच्या प्रधान शाखेतून पोष्टाने संबंधित सर्व शाखांना पाठवली जात असल्याने ही पे बिले मिळेपर्यंत खात्यावरील जमा रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करता येत नसल्याने पगाराला विलंब होत आहेत. जर टपालाद्वारेच पे बिले पाठवली जात असतील तर मग आॅनलाईन प्रक्रियेचा उपयोग काय? असा सवाल शिक्षकवर्गातून केला जात आहे.जिल्हा बँक जबाबदार : पाच तारखेनंतरच वेतन१ तारखेला वेतनाची रक्कम जमा होऊनदेखील कर्मचाऱ्यांना ५ तारखेनंतरच वेतन मिळत आहे. हे वेतन विलंबाने मिळण्याला जिल्हा बँक जबाबदार आहे. यासाठी पे बिले जिल्हा बँकेच्या संबंधित शाखांमध्ये १ तारखेला कशी जमा होतील याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे.- रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषदगांभीर्यच नाहीरत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गेले कित्येक दिवस तसाच प्रलंबित आहे. मध्यंतरी तर हा प्रश्न खूपच गंभीर बनला होता. मात्र, त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे.जिल्हा बँकेमुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब.राष्ट्रीयकृत बँकेमध्येच वेतन मिळावे, शिक्षक परिषदेने केली मागणी.