शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये पुन्हा एकदा सदानंद चव्हाण

By admin | Updated: October 20, 2014 00:53 IST

विधानसभा निवडणूक : शेखर निकमांचा निसटता पराभव

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघात दिवाळीपूर्वीच शिवसेनेने जोरदार फटाके फोडले. विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना पुन्हा एकदा मतदारांनी संधी दिली आहे. चिपळूणच्या इतिहासात चव्हाण यांच्या रुपाने तिसऱ्या रुपाला दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळाली आहे. शेखर निकम यांचा निसटता पराभव झाला. त्यांनी तो मान्य केला. चिपळूण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी आज (रविवारी) सकाळी ८ वाजता गुरुदक्षिणा सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील, वैशाली माने यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उमेदवार सदानंद चव्हाण, शेखर निकम व इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपचे उमेदवार माधव गवळी हे बाराव्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रात दाखल झाले. पहिल्या फेरीपासूनच सदानंद चव्हाण यांनी आघाडी घेतली. पहिल्या दोन फेरीत सदानंद चव्हाण आघाडीवर होते. तिसऱ्या व चौथ्या फेरीत शेखर निकम यांनी आघाडी घेतली. पुन्हा पाचव्या फेरीपासून आठव्या फेरीपर्यंत चव्हाण आघाडीवर होते. नवव्या, दहाव्या व अकराव्या फेरीअखेर शेखर निकम हे ३२७४ मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर मात्र, चौदाव्या फेरीत पुन्हा निकम यांना आघाडी मिळाली. ही एक फेरीवगळता २३व्या फेरीपर्यंत चव्हाण यांची आघाडी कायम राहिली. अखेर ६ हजार ६८ मतांनी चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणी सुरु असताना आमदार चव्हाण व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम बाजूबाजूला बसले होते. दोघेही नातेवाईक असल्याने आपापसात चर्चा सुरु होती. निकम यांची आघाडी असताना त्यांनी आपली ही आघाडी किरकोळ आहे. चिपळूणमध्ये आपल्याला किमान ८ ते १० हजारांची आघाडी हवी होती. त्यामुळे आपला पराभव निश्चित आहे. ५ ते ६ हजारानी आमदार चव्हाण विजयी होतील, असे सांगितले. पराभव दृष्टीपथात असताना तो पचविण्याचा प्रयत्न निकम यांनी केला. अंतिम टप्प्यात १९व्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर निकम यांनी केंद्र सोडले. (प्रतिनिधी)