शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक तणावातून सचिन देवरुखकरची आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

चिपळूण : शहरातील बेंदरकर आळी येथील सचिन देवरुखकर या तरुणाने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे गूढ कायम ...

चिपळूण : शहरातील बेंदरकर आळी येथील सचिन देवरुखकर या तरुणाने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे गूढ कायम असले, तरी तो गेले काही दिवस तणावाखाली वागत होता. त्याच्या वागण्यात मोठा फरक पडला होता. त्यामुळे मानसिक तणावातून त्याने असे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा परिसरात ऐकण्यास मिळत आहे.

चिपळूण तसेच मुंबई व पुणे येथे देवरुखकर ज्वेलर्स म्हणून प्रसिद्ध असलेले सुभाष देवरुखकर यांचा मुलगा सचिन देवरुखकर याने शुक्रवारी सायंकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आणि बेंदरकर आळीसह वडनाका, वाणीअळी परिसरात एकच खळबळ उडाली. गेल्या महिनाभरात याच परिसरातील ही दुसरी आत्महत्या असल्याने साहजिकच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिनाभरापूर्वी अभिजित गुरव या तरुणाने आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचना आणि सावकारी कर्जाचा जाच त्यामुळे अभिजितने आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

सचिन देवरुखकर या तरुणाच्या बाबतीत असे काहीच नसल्याने त्याच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. प्रत्यक्षात देवरुखकर कुटुंब हे सधन कुटुंब आहे. ज्वेलर्स व्यवसायात त्यांचे मोठे नाव आहे. सचिन हा स्वतः चिपळूण येथील पेढी संभाळत होता. त्यामुळे आर्थिक विवंचना अथवा कर्ज वगैरे अशी कोणतीच तणावाची परिस्थिती नव्हती. वेळप्रसंगी तो मित्रांना आर्थिक मदत करणारा तरुण होता. त्यामुळे त्याची आत्महत्या आश्चर्याचे कारण बनली आहे.

गेले काही दिवस त्याच्या वागण्यात बोलण्यात कमालीचा फरक पडला होता. त्याला शोभिवंत मासे आणि फिश टँकची प्रचंड हौस होती. परंतु गेल्या काही दिवसात त्याने ते मासे आणि फिश टँक विकून टाकले होते, असेही त्याचे मित्र सांगतात. परंतु तो असे काही टोकाचे पाऊल उचलेल हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. तीनच दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण देवरुखकर कुटुंब दुःखात होते. सचिनच्या वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी नवीन कार बुक करण्यात आली होती. परंतु आजीच्या निधनामुळे ती कार घरी आणली नव्हती, अशी माहितीही मिळत आहे. एका तरुणाबाबत झालेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.