शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

ग्रामीण भागातील जलस्रोत संकटात

By admin | Updated: April 11, 2016 00:55 IST

खेड तालुका : पाणीटंचाईची दाहकता अधिक; आजही ३२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

श्रीकांत चाळके --खेड तालुक्यातील खेड्यापाड्यात आजही पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते़ विविध जलस्रोत उपलब्ध असतानाही निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत़ याकडे लक्ष देण्यास प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही वेळ नसल्याने सारे जलस्रोतच संकटात आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात आणि विशेषत: धनगरवाड्यांमध्ये आजही पाणी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़खेड तालुक्यातील ३२ गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये तर ही समस्या अधिकच जटील झाली आहे़ तालुक्यात नदी, ओढे, नाले यासारखे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत़ यातील बरेच जलस्रोत हे गाळांनी भरले आहेत. प्रशासनासह लोकप्रतिनिधिंनीही या जलस्रोतांकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे ते विकसित झालेले नाहीत़ पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा जास्त कल आहे. जुन्या योजना दुरूस्त करुन वेळ मारून न्यायचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करत आहेत. शासनाकडून तालुक्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत़ मात्र, या बंधाऱ्यांमध्येही पाण्याचा खडखडाटच आहे. या बंधाऱ्यांचा समावेश टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला असल्याने या गावांनाही पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गेल्या १५ वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत़ खेड तालुक्यातील जगबुडी नदींसह इतर छोट्या, मोठ्या नद्यांकडेही दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे़ पाणीटंंचाई काळात जगबुडी नदीवरच मोठा भार पडत आहे़ खेड शहराला पाणीपुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे़ या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ हा गाळ काढण्याचा प्रयत्न खेड नगरपालिकेकडून होत आहे़ मात्र, लोकप्रतिनिधींची उदासिनता आणि अपुऱ्या निधीमुळे बोरज धरण अधिकाधिक गाळात रूतत चालले आहे. मागील काही महिन्यांपासून या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे़ मात्र, तरीही पुरेसा पाणीसाठा नसल्याने प्रतिवर्षी खेड शहराची तहान पिंपळवाडी धरण भागवित आहे़ याच धरणातून १ एप्रिलपासून खेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. जगबुडी नदीचा सुकिवलीमध्ये शिरवली धरण व नातूवाडी धरणाच्या पाण्याशी संगम झाला आहे़ या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहराला देखील पुरविले जात आहे़ तर उर्वरित पाणी हे खाडीला मिळत असल्याने खाडीपट्टा भागातील जनतेला मार्च महिन्यापासून तात्पुरत्या नैसर्गिक जलस्रोतांंवरच अवलंबून राहावे लागते. तसेच या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे़ नैसर्गिक जलस्रोतांचा विचार करून त्यावर उपाययोजना न केल्याने पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या जलस्रोतांचे जतन केल्यास निश्चितच पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते.पाणी खाडीला : जलस्रोतांवर बागायतीतालुक्यातील बहुतांश नद्यांचे पाणी पूर्व पश्चिम उतारामुळे खाडीला मिळते़ यातूनच पारंपरिक जलस्रोतांना पाणी मिळते़ या जलस्रोतांच्या आधारेच गावांमध्ये शेती तसेच बागायती केली जाते़ शेती व बागायतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने या नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी हे मार्च महिन्यातच संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.नैसर्गिक स्रोतांचे झरे लुप्त...या भागातील प्रदूषणामुळे नैसर्गिक स्रोतांंचे झरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत़ नैसर्गिक स्रोत असलेली ठिकाणे वाचविण्यासाठी ग्रामपातळीवर व शासकीय पातळीवर जनजागृती करण्याची गरज आहे.