शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जीवाची बाजी लावून ‘त्यां’नी जाेपासले मदतीचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

सचिन मोहिते / देवरुख : आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसांसाठी मदतीला आलो पाहिजे ही भावना मनात कायम ...

सचिन मोहिते / देवरुख : आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसांसाठी मदतीला आलो पाहिजे ही भावना मनात कायम ठेवून अडीअडचणीत असलेल्यांना मदत करण्याचे काम निवळी - बावनदीतील बाैद्धवाडी येथील रमेश सावंत यांनी सुरू ठेवले आहे. गेली २५ वर्षे ते जीवाची बाजी लावून मदत करण्याचे व्रत त्यांनी जाेपासले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन देवरूख पाेलिसांनी त्यांचे काैतुकही केले.

तळेकांटे येथे गीते नामक व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केले आणि रमेश सावंत हे नाव सर्वांसमाेर आले. काेणतीही अपेक्षा न ठेवता आणि हातात ग्लोज नाही की तोंडाला मास्क नाही तर कधी खोल पाण्यात उतरण्याची वेळ आली तर ऑक्सिजनदेखील न वापरता मदत कार्यासाठी रमेश सावंत पुढे असतात. बावनदी पंचक्रोशीतील निवळी, तळेकांटे, करबुडे या गावातील तरुण नेहमीच मदत कार्यात पुढे असतात. सावंत आणि त्यांचा ग्रुप हा नदीकाठचा असल्याने त्यांना पूर हा विषय तसा नवीन नाही. त्यामुळे कितीही पाण्यातून कसे तरुन जायचे याचे कौशल्य रमेश यांना आहे. त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना पोहण्याच्या प्रकार तसेच पाण्याचा प्रभाव-प्रवाह कसा ओळखायचा आणि आपली पोहण्याची चाल कशी ठेवायची याचे ते तरुणांना प्रशिक्षण देतात.

पूल नसताना चाकरमान्यांना सुमारे पाचशे फूट लांब नदी पत्रातून त्यांना पाठीवरून ने-आण करण्याचे काम ते करत हाेते. नदीपात्र पूर्ण भरलेले असतानाही त्यात बिनधास्तपणे उतरून मदत करण्याची सचाेटी त्यांच्याकडे आहे. एखाद्या धरणाला गळती लागल्यास त्या धरणाच्या तळाशी उतरून ते स्वतः ती गळती थांबवतात. आजपर्यंत लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, निवळी अशा अनेक ठिकाणी आपत्कालीन स्थितीत नेहमी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन देवरूख पाेलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी रमेश सावंत यांच्यासह संजू सावंत, रामदास सावंत, प्रमाेद खापरे यांचा सत्कार करण्यात आला.

-----------------------

आम्ही हार तुरे गुलाबाच्या फुलांसाठी काम करत नाही; मात्र थाप उभारी देते. जेव्हा आम्हाला एखादी घटना कळते आणि आम्ही तिथे जातो तेव्हा स्थानिक पोलीस आम्हाला पुढे पाठवत नाही. मग त्या ठिकाणी जाऊन कधी कधी त्यांना आम्हाला माहिती आहे, अशी कामे आम्ही करतो. त्यामुळे मदत करण्यासाठी आम्हाला तसे ओळखपत्र मिळाले तर अशी वेळ येणार नाही.

- रमेश सावंत

190721\img-20210719-wa0047.jpg

स्पर्शच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय पथकाचे आरोग्य सेवेला बळकटी – आ.ज्ञानराज चौगुले