शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पिंग हँड्सच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST

रत्नागिरी : येथील हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्तम प्रतिसादात पार पडले. शहराच्या जयस्तंभ भागातील गीता भवन ...

रत्नागिरी : येथील हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्तम प्रतिसादात पार पडले. शहराच्या जयस्तंभ भागातील गीता भवन येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांचे व रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक केले.

जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या विविध रुग्णांची संख्या लक्षात घेता, सध्या या रुग्णालयात विविध गटांच्या रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या कोरोनाने बाधित होणाऱ्यांची वाढती संख्या आणि लसीकरण प्रक्रिया याचा परिणाम रक्तसंकलनावर होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीला सध्या रक्तगटांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे.

त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसिस शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण, विविध शस्त्रक्रिया, प्रसुती, थॅलेसिमिया, हिमोफिलियाचे रुग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रुग्ण, आदींना पुरवठा करताना अडचणी येत आहेत.

त्यामुळे हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी गीता भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदात्यांना हेल्पिंग हँड्सकडूनही प्रमाणपत्र देण्यात आले.

जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने हेही होते. यावेळी डाॅ. पाटील यांनी हेल्पिंग कार्यकर्त्यांसाेबत विविध समस्यांवर चर्चा केली.