शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती महत्त्वाची - रवींद्र इनामदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती महत्त्वाची आहे. यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे ...

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती महत्त्वाची आहे. यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी केले. मंडळाच्या कार्यालयात आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

मंडळाच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले होते. ८ वी ते १० वी वयोगटात मधुमती मयेकर तर खुल्या गटात प्रथम आलेले रामचंद्र आनंदा चव्हाण पाटील यांना मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आणि कार्यवाह प्रभाकर सनगरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक प्रभाकर सनगरे यांनी केले. रामचंद्र चव्हाण - पाटील, श्रावणी पारकर, कल्पेश पारधी, अविनाश काळे आदी स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन व आभार प्रभाकर सनगरे यांनी केले. कोविड नियमावलीचे पालन करून बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाच्या नियोजनात गौरव मुळ्ये यांनी सहकार्य केले.

...............

फोटो मजकूर

रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे यांच्या हस्ते विजेत्यांना गाैरविण्यात आले.