शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पंधरामाड ग्रामस्थांचा स्थलांतराला नकार

By admin | Updated: July 10, 2016 01:44 IST

समुद्राला उधाण : स्थलांतर नको, बंधारा बांधून द्या

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या पंधरामाड येथील १४ कुटुबांनी स्थलांतराच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. स्थलांतर करणार नाही, असा चंग पंधरामाड येथील या कुटुंबियांनी केला आहे. यावर स्थलांतर हा पर्याय नव्हे तर बंधारा बांधा, अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.मुरूगवाडा, पंधरामाड परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या मदतीअभावी हाल होत आहेत. या परिसरातील चौदा कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध न करताच स्थलांतरीत होण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. अमावस्येचा उधाणाने जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागाला समुद्री लाटांचा चांगलाच तडाखा बसला होता. याचा सर्वाधिक फटका मिऱ्या, काळबादेवी, मुरूगवाडा व पंधरामाड या परिसराला बसला. त्यामुळे येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांनी पूर्णपणे गिळंकृत केला.समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पंधरामाड येथील घरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करुन मुरूगवाडा व पंधरामाड येथील १४ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे.परंतु, या नोटीसला येथील नागरिकांनी केराची टोपली दाखवत स्थलांतराला विरोध केला आहे. यापुढेही दर्श अमावस्या, पोर्णिमेची भरती, आदी उधाणांचा सामना या नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे स्थलांतर हा यावर पर्याय नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने याठिकाणी बंधारा बांधावा, अशी मागणी करण्यात येत आहे. येथील बहुतांशी कुटुंबे ही रापणीतून मिळणाऱ्या मासेमारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे येथून स्थलांतर करून काय करणार? असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. स्थलांतरासाठी पर्यायी जागाही उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे येथून स्थलांतर करणार नाही, असा इशारा आपदग्रस्त १४ कुटुंबांनी दिला आहे. (वार्ताहर)