शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांमध्ये ४२ लाख दंड वसूल

By admin | Updated: August 21, 2014 00:30 IST

अवैध वाळू उत्खनन : तहसीलदारांची कारवाई

चिपळूण- तालुक्यात अवैध वाळू उत्खनन, वाळूसाठा तसेच जांभाचिरा, काळा दगड, माती उत्खनन राजरोसपणे होत होते. जांभ्या चिऱ्यावरील बंदी उठली असली तरी वाळू उत्खननावर बंदी कायम आहे. गेल्या ७ महिन्यात २३६ प्रकरणावर कारवाई करुन ४२ लाख ३७ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तालुक्यात जांभाचिरा वाहतूक व अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार वृषाली पाटील यांच्याकडे आल्या होत्या. वाळू प्रकरणी तहसीलदार पाटील यांनी कडक धोरण अवलंबले असून, त्यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. महसूल खात्याचे पथक वेळीअवेळी गस्त घालून बाहेरुन येणाऱ्या गाड्या पकडून कारवाई करत होते. उंब्रजहून मोठ्या प्रमाणावर वाळू चिपळूणमध्ये येत असते. शिवाय स्थानिक वाळू उत्खनन करणारे आपापल्या परीने कार्यरत असतात. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांचे काम सुरु असते. अशा लोकांवरही तहसीलदार पाटील यांनी धडक कारवाई केली आहे. जानेवारी ते जुलैअखेर जांभा, चिरा, काळा दगड, माती उत्खनन करणाऱ्या १४७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २५ लाख ८७ हजार १२५ रुपये दंड आकारण्यात आला. तर जांभा व चिरा, काळा दगड, वाळू वाहतूक करणाऱ्या ८० जणांवर कारवाई करुन ७ लाख ६२ हजार ५२५ रुपये दंड करण्यात आला. ९ ठिकाणी वाळूसाठा पकडून तो जप्त करण्यात आला. त्या मालकांना ८ लाख ८७ हजार ६०० रुपये दंड करण्यात आला. एकूण महसूल खात्याने कठोर पावले उचलत ७ महिन्यात ४२ लाखाचा महसूल जमा केला आहे. ही मोहीम यापुढे अशीच सुरू राहणार आहे.अशी झाली कारवाई जानेवारी ते जुलैअखेर २३६ प्रकरणे दाखल. एकूण ४२ लाख ३७ हजार २५० हजार रुपये दंडात्मक कारवाई. जांभाचिरा, दगड, माती उत्खननाची १४७ प्रकरणे. वाळू वाहतुकीची ८० प्रकरणे. वाळूसाठा जप्त ९ प्रकरणे.