शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर रमेश कदम स्वगृही

By admin | Updated: July 14, 2014 00:12 IST

पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्याचा दावा : कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत आला. निष्ठावंत कार्यकर्त्यांची होणारी घुसमट यामुळे आपण वर्षभरापूर्वी या पक्षाचा राजीनामा दिला. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी आता भविष्यात योग्य सन्मान देण्याचे आश्वासन दिल्यानेच आपण पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज, रविवारी येथे सांगितले. जयेश येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे रायगड मतदारसंघातून तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यात अपयश आले. मात्र, संगमेश्वर, चिपळूण मतदारसंघांतील कार्यकर्ता संभ्रमात होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या पुढाकाराने तटकरेंना घेऊन मुंबईमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा झाली. अन्यायाचे निराकरण करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. पुन्हा पक्षात सक्रिय व्हा, असे ज्येष्ठांनी सांगितले. त्यांचा सन्मान ठेवून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात मुंबई येथे पक्षश्रेष्ठींची बैठक होणार असून, या बैठकीत आपण सन्मानाने राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची धुरा सांभाळणार आहोत. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती खंबीरपणे पार पाडणार आहे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)