शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगरपालिका सभेला सत्ताधारीच गैरहजर

By admin | Updated: July 29, 2014 00:01 IST

मयेकर यांनी सभा केली रद्द : सामंत-महायुती वाद पुन्हा रंगणार; रस्त्याच्या कामांचा विषय असल्याने अघोषित बहिष्कार

रत्नागिरी : नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखालील रत्नागिरी पालिकेच्या पहिल्याच विशेष सभेला आज, सोमवारी सत्ताधारी युतीचे नगरसेवकच गैरहजर होते. २१ कोटींच्या रस्ते डांबरीकरण कामावरून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उदय सामंत व पालिकेतील सत्ताधारी महायुती यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळेच आजची पालिका बैठक रद्द झाल्याचे स्पष्ट झाले.नगराध्यक्ष निवडीपूर्वी (२४ जुलै) प्रशासकांनी लावलेल्या या सभेच्या विषयपत्रिकेद्वारे शहरातील २१ कोटींच्या डांबरीकरण कामांचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, त्यातील काही कामे कार्य आदेश (वर्कआॅर्डर) देण्यापूर्वीच झालेली असताना त्यांचा या कामांच्या यादीत समावेश आहे. त्याबाबतचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी करूनही न मिळाल्याने ही विशेष सभा रद्द करण्यात आली. काही नगरसेवकांनी आज रजा टाकली होती. आम्हाला विकास हवा आहे; परंतु केवळ घोषणा नको. विकासकामांचा निधी पालिकेच्या खात्यात जमा झाला, तर आम्ही मान्य करू, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले. आज सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या सभेवर सत्ताधारी सेना-भाजपच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. सभेला हे नगरसेवक अनुपस्थित होते, तरी प्रत्यक्षात नगरपालिकेच्या आवारात ते दिसून येत होते. आजच्या पालिका सभेला नगराध्यक्षांसह दहा सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सेनेचे उमेश शेट्ये, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर, बाळू साळवी, प्रीती सुर्वे, स्मितल पावसकर, अभिजित गोडबोले, सईद पावसकर, मुनीज जमादार, कॉँग्रेसच्या नगरसेविका मुनज्जा वस्ता यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)मुख्याधिकारी आहेत कुठे?आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी आपल्याशी साधा संवादही साधलेला नाही. त्यावरून त्यांची कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे. याप्रकारे काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडून शहर विकासाबाबत काय अपेक्षा ठेवणार? मुख्याधिकारी आहेत कुठे, असा सवाल माझ्यासह सर्व नगरसेवकांचा आहे, असे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर म्हणाले.