शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी ५९७ साकव मोडकळीस

By admin | Updated: August 18, 2014 23:29 IST

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

रहिम दलाल- रत्नागिरी --जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५९७ साकव मोडकळीस आले आहेत. या साकवांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेले वर्षभर धूळखात पडून आहे, तर या साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे अद्याप निधीची तरतूदच नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावरुन ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या साकवांची स्थिती दयनीय झाली असून, ते मोडकळीस आले आहेत. हे साकव मोडकळीला आल्याने धोकादायक स्थितीत असल्याने त्यावरुन जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ ये-जा करतात.वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीला आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडे मागविले होते. जिल्हाभरातून ५९७ साकवांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी आले होते.या साकवांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ६ लाख ७८ हजार रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार केला होता. मात्र, जिल्हा परिषदेकडे साकवांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल, २०१३ मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. वर्ष उलटले तरी हा दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धूळखात पडून आहे. त्याबाबत त्यांना जिल्हा परिषदेकडे वारंवार या दुरुस्तीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याला अजिबात प्रतिसाद देण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यातील साकव दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव ग्रामविकास खाते आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यामुळे आता तरी या साकवांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.