शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

बचत गटांना रेशन दुकान

By admin | Updated: August 21, 2014 00:26 IST

पुरवठा विभाग : ७२ पैकी १६ प्रस्तावांना मंजुरीे

रत्नागिरी : जिल्ह्यातील नव्या ६५ रेशनदुकानांसाठी बचत गटांकडून आलेल्या ७२ प्रस्तावांपैकी १६ प्रस्तावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. आवश्यक साधनसामुग्री, भांडवल आदींची पूर्तता बचत गटांनी केल्यानंतर ही दुकाने सुरू होणार आहेत.जिल्ह्यात ८९४ रास्तदर धान्य दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७९३ दुकाने कार्यरत आहेत. उर्वरित १४३ दुकाने अद्याप रिक्त आहेत. यापैकी ४२ दुकाने तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यास देण्यात आली असून, १०१ दुकाने अद्याप रिक्त आहेत. यापैकी पुरवठा विभागाकडून ६५ रेशन दुकाने बचत गटांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. या ६५ दुकानांसाठी ७२ प्रस्ताव आले आहेत. त्यांची छाननी करून १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. गतवर्षी बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी रेशनदुकाने महिला बचत गटांना चालवण्यास देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्याला महिला बचत गटांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, यावर्षी पुरूष आणि महिला बचत गटांकडून प्रस्ताव आले आहेत.रेशनदुकानांसाठी आवश्यक ती कागदपत्र आणि भांडवली खर्चाबरोबर त्या गावातील महिला ग्रामसभेच्या मंजुरीची आवश्यकता अनिवार्य केली आहे. या १६ बचत गटांना महिला ग्रामसभेत मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांचे प्रस्ताव पुरवठा विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे बचत गटांना देण्यात येणाऱ्या ६५ दुकानांपैकी १६ दुुकाने लवकरच सुरू होणार आहेत. उर्वरित ४९ दुकानांसाठीच्या प्रस्तावांनाही त्या त्या गावच्या महिला ग्रामसभेच्या मान्यतेनंतर पुरवठा विभागाची मंजुरी मिळणार आहे. या महिनाअखेरीस हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांनी दिली. खेड तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात २, दापोलीत ४, गुहागरमध्ये ३ आणि संगमेश्वर तालुक्यात एक अशी १६ दुकाने आता बचत गटांकडून चालविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)