शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरची राजहोळी यंदा जवाहर चौकात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:30 IST

राजापूर : राजापूरची ग्रामदेवता श्रीनिनादेवीच्या मानकऱ्यांच्या सभेत यंदा शिमगोत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाच्या आदेशाप्रमाणे साजरा करण्याचे ठरवण्यात आले. कोविडचा ...

राजापूर : राजापूरची ग्रामदेवता श्रीनिनादेवीच्या मानकऱ्यांच्या सभेत यंदा शिमगोत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाच्या आदेशाप्रमाणे साजरा करण्याचे ठरवण्यात आले. कोविडचा उद्रेक आपल्या शहरात व आजूबाजूला होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. शहरातील प्रमुख होळी असलेल्या ग्रामदेवता निनादेवीची राजहोळी सालाबादप्रमाणे जवाहर चौक येथे न नेता निनादेवी मंदिर येथून परीट घाटीने मांडावर उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ही होळी पाहण्यासाठी शहर व तालुक्यातून हजारो लोकांची उपस्थित राहतात.

यंदा राजहोळीच्या उत्सवात वाद्ये वाजविण्यात येणार नसून, होळी खेळविली जाणार नाही. पौर्णिमेचा होम अत्यंत छोट्या स्वरूपात, कमी लोकांत करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशीची मुलांची होळीही साधेपणाने कन्या शाळेजवळील मांडावर उभी करण्यात येईल. रोंबट रात्री आठ वाजता वरच्या पेठेमधून निघून दहापूर्वी मांडावर येईल. यावेळी ठरावीकच मंडळी उपस्थित असतील.

रंगपंचमी आठ ते दहा माणसांच्या उपस्थितीत महापुरुषाला रंग लावून वरची पेठ, जवाहर चौक मार्गे सायंकाळी सहापूर्वी होळीच्या मांडावर येईल. यामध्ये रंग उडविला जाणार नाही. सायंकाळी साडेसहा वाजता मांडावरून देवी निनादेवी मंदिरात येईल व शिमगोत्सवाची सांगता येईल. देवीचे निशाण दोन- तीन माणसांत घरोघरी जाईल. यावेळीही वाद्य वाजविले जाणार नाही. या बैठकीला मंडळाचे विश्‍वस्त नंदकुमार चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रभाकर चव्हाण, बाळ करंगुटकर, नंदकिशोर चव्हाण, देवीचे पुजारी दीपक गुरव आदी उपस्थित होते.