शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर पोलिसांनी मागितली माफी

By admin | Updated: March 3, 2015 00:32 IST

बोगस दाखले प्रकरण : तहसीलदारांना दिले पत्र, ताब्यात घेतलेला दस्तऐवज परत

राजापूर : बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता राजापूर पोलिसांनी नेलेला दस्तऐवज अखेर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रितसर पत्रान्वये पुन्हा राजापूर तहसीलदारांकडे जमा केला आहे. मात्र, या दस्तऐवजात काही बदल झाला असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राजापूर पोलिसांचीच राहील, असे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांचे सील वापरुन खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेले तीन आठवडे राजापुरात चांगलेच गाजत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासावर सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोस्टाव्दारे अज्ञाताने दोन बोगस दाखले पाठवले होते.या दाखल्यांवर राजापूर सेतू कार्यालयाचा लोगो असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी आपला मोर्चा सेतू कार्यालयाकडे वळवला होता. अचानकपणे सेतू कार्यालयात तपासासाठी जाताना राजापूर पोलिसांनी याबाबतची कोणतीही कल्पना तहसीलदारांना दिली नव्हती. उलट राजापूर सेतू कार्यालयात विनापरवाना घुसून कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज हस्तगत केला गेला होता.या सर्व प्रकारामुळे राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी पोलिसांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून समज येताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत तहसीलदारांच्या अपरोक्ष गेलेला सेतू कार्यालयातील दस्तऐवज पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे लेखी न देता तसे दस्तऐवज स्विकारण्यास राजापूर तहसीलदारानी स्पष्ट नकार दिला व अगोदर विनापरवाना गेलेला दस्तऐवज जबाबदार अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानिशी सादर करावा, असे फर्मावले. त्यामुळे हतबल झालेल्या राजापूर पोलिसांनी संबंधित दस्तऐवज अखेर लेखी पत्रानिशी राजापूर तहसीलदारांच्या ताब्यात देऊन आपली सुटका करून घेतली.दरम्यान, याप्रकरणी राजापूर पोलिसांना अन्य कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज हवे असल्यास त्यांना लेखी पत्रानंतर देण्यात येतील, तसेच याप्रकरणी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब राजापूर पोलिसांनी आपल्यासमोर घेण्यात यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (प्रतिनिधी)