शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा व्यत्यय तरीही उत्साह कायम

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

चिपळूणचे सांस्कृतिक केंद्र : वेस मारुती मंदिरात रंगली काव्यसंध्या

चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, चिपळूण व ‘आम्ही चिपळूणकर’तर्फे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरु व्हावे म्हणून लोकचळवळ सुरु आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारावरील काव्यसंध्या कार्यक्रमात पावसाने व्यत्यय आणला. मात्र, हा कार्यक्रम नजीकच्या वेस मारुती मंदिरात रंगला. या कार्यक्रमात संजीव अणेराव, राजन इंदुलकर, रमाकांत सकपाळ, राजू जाधव, अरुण इंगवले, मच्छिंद्रनाथ वाटेकर, श्रीराम दुर्गे, मुजफ्फर सय्यद, जाफर गोठे, ऋजुता खरे, वेदिका पडवळ, नीला वरवाटकर, माया गोदाडे, कुमार कोवळे, संतोष पुरोहित, शिवाजी शिंदे, सुनीता गांधी, प्रताप गजमल, बाळकृष्ण चव्हाण, प्रकाश सरस्वती गणपत, सुनील खेडेकर आदी उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पारावरील काव्यसंध्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ढग दाटून आले होते, अशा परिस्थितीतही हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमामध्ये आर्या चौगुले, संदीप परुळेकर, स्मिता गवाळे, रवींद्र गुरव आदींसह विविध कवींनी या मंदिरात रंगलेल्या कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या. चिपळूण शहरातील या एकमेव सांस्कृतिक केंद्राबाबत गेले अनेक महिने वेगवेगळ््या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. मात्र या प्रयत्नाना यश अलेले दिसत नसल्याने हे केंद्र नव्याने प्रयोगासाठी सिध्द व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी चिपळुणातील अनेक संस्थांनी यापूर्वी प्रयत्न केले आता आम्ही चिपळूणकर या सामाजिक संस्थेने अशा कार्यासाठी वेगवेगळ््या कार्यक्रमातून जागृती आणण्याची पावले उचलली आहेत. पारावरची काव्यसंध्या या कार्यक्रमातून सांस्कृतिक केंद्राच्या सुधारणांसाठी पुढाकार घेतला गेला आहे. शहरातील अनेक मंडळी एकत्र येऊन उभी राहिलेली असल्याने आता नव्या उपक्रमशिलतेतून तरी प्रसासनाला जाग येईल का असा प्रश्न शहरवासिय प्रशासनाला विचारीत आहेत. (वार्ताहर)इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ९ वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी आम्ही सारे चिपळूणकर यांच्यातर्फे हे केंद्र सुरु व्हावे, यासाठी लोकोत्सव कार्यक्रम झाला. ही लोकचळवळ पुढे चालूच राहावी व सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीला चालना मिळावी, यासाठी रविवारी सायंकाळी पारावरची काव्यसंध्या कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने पुढील कार्यक्रम नजीकच्या वेस मारुती मंदिरात घेण्यात आला. सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम सुरु होता.