शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान निम्म्यावर आल्याने धक्का

By admin | Updated: October 12, 2014 23:33 IST

परिणाम शक्य : वर्गखोल्या रखडणार

श्रीकांत चाळके - खेड =जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत करोडो रूपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच शाळांसाठी देण्यात येणारे अनुदान आता निम्म्यावर आले असल्याने याचा वार्षिक आराखड्यावर विपरित परीणाम झाला आहे. या अनुदानामध्ये आता मोठी घट झाली असून, यावर्षीच्या वार्षिक आराखड्यामध्ये केंद्र शासनाने केवळ २३ कोटी ७४ लाखांची भर घतली आहे. याचा मोठा फटका जिल्ह्यातील शेकडो वर्गखोल्यांना बसणार आहे़प्रतिवर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून केंद्र शासनाकडे सर्व शिक्षा अभियानाचा ५० कोटी रूपयांपर्यंतचा वार्षिक आराखडा सादर करण्यात येत असे. याद्वारे वर्गखोल्यांसाठी कोट्यवधी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत होते. आता मात्र हा वार्षिक आराखडा निम्म्यावर आला आहे़ हे अनुदान शाळाबाह्य मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तके, युनिफॉर्म, शिक्षक वेतन, शिक्षक प्रशिक्षण, गटसाधन केंद्र, समूह साधन केंद्र, शाळा अनुदान, देखभाल दुरूस्ती, अपंग शिक्षण, व्यवस्थापन समिती प्रशिक्षण, संशोधन मूल्यमापन आणि व्यवस्थापन याकरिता या अनुदानाचा वापर होत असे.ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम करण्यात येत होते़ यामुळे १०० ते १५० वर्गखोल्यांची कामे घेण्यात येत होती. आता हे अनुदान बंद झाल्याने वर्गखोल्यांची कामे घेणे बंंद झाले आहे़ त्यामुळे यंदाचा सर्व शिक्षा अभियानाचा आराखडा बराच कमी झाला आहे़ तसे पाहता चालू आर्थिक वर्षातील सर्व शिक्षा अभियानातून २३ कोटी ७४ लाख यपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.यामध्ये २०१३-१४ सालचे उर्वरित ३ कोटी १० लाख २१ हजार रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यापुढे मात्र नवीन वर्गखोली बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियांनातून मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वर्गखोल्यांची कामे रखडणार आहेत. याचा मोठा फटका जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शेकडो शाळांमधील वर्गखोल्यांना बसणार आहे. (प्रतिनिधी)सर्व शिक्षामधील अनुदान रद्द...शाळांसाठीचे अनुदान निम्म्यावर.वार्षिक आराखड्यावर विपरित परिणाम.यंदा केवळ २३ कोटी ७४ लाख. मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती अशक्य.जिल्हाभरातील नादुरूस्त वर्गखोल्यांचे काम रखडणार.दरवर्षी सुमारे १५0 वर्गखोल्यांचे काम केले जायचे. अनुदान बंदचा निर्णय धक्कादायक.