शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाबाबत जनसुनावणीची मागणी

By admin | Updated: December 23, 2014 23:41 IST

जामदा धरण : धर्मराज्य शेतकरी संघटनेने दिले निवेदन...

रत्नागिरी : जामदा पाटबंधारे प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी पुन्हा जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी धर्मराज्य शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुनर्वसन आराखड्यासह पुनर्वसन, भूसंपादन तसेच विहिरी, घरांची मोजणीही अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.जामदा पाटबंधारे प्रकल्प राबवताना बुडीत क्षेत्रातील काजिर्डा आणि राणेवाडी गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही. या ठिकाणी वर्षाचे ३६५ दिवस मुबलक पाणी असताना तेथे धरणाची गरजच नसल्याचे धर्मराज्य शेतकरी संघटनेचे मत आहे.भूसंपादन करताना कलम ४ ते ११नुसार सर्व कलमांची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, आजवर करण्यात आलेल्या घरे, विहिरी, शेतजमिनी व वनजमिनी यांची मोजणीही व्यवस्थित झालेली नाही. काजिर्डा राणेवाडीतील झाडांचीही योग्य मोजणी झाली नाही. रस्ते, घरे, शाळा व इतर सुविधांसाठी घ्यावयाचे एकूण भूखंड क्षेत्र निश्चित करण्यात आलेले नाही, असा आरोप या शेतकरी संघटनेने केला आहे.हा प्रकल्प मुद्दामहून रेगाळत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च दहापटीपेक्षा अधिक वाढला आहे. या एकूणच प्रकल्पामध्ये अतोनात पैसा ठेकेदाराच्या घशात घालण्यात आल्याचा आरोपही संघटनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.प्रकल्पग्रस्तांना देयक क्षेत्र जमीन, पर्यायासाठी लागणारी शेतजमीन योग्य पद्धतीने देण्यात आली नसल्याचा आरोपही संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी हरकतीही घेतल्या आहेत. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. असा आरोप संघटनेने केला असून, हा प्रकल्प रद्द करावा तसेच काजिर्डा - राणेवाडी येथील ग्रामस्थांची जनसुनावणी घेण्याबाबत येत्या १५ दिवसांत बैठक बोलवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)