शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

योजनांची प्रगती असमाधानकारक

By admin | Updated: December 2, 2014 00:30 IST

अपेक्षा वाढल्या : पतपुरवठा घेणाऱ्यांची संख्या कमी

श्रीकांत चाळके - खेड -राज्यातील अन्नधान्याची हेक्टरी उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यासाठी उपाययोजना करूनही उत्पादनक्षमतेत वाढ होत नाही. शेतकऱ्यांचे कृषीविषयक ज्ञान वाढले पाहिजे. मात्र अनेक योजना असूनही त्यांची प्रगती, वाटचाल आणि अंमलबजावणी असमाधारकारकच राहिली आहे.कृषीविषयक सर्व योजनांची अंमलबजावणी थेट शेतकरी गटांमार्फतच करण्याचे आघाडी शासनाने ठरविले होते़ मात्र, गेल्या दोन वर्षात तसे प्रयत्न झाले नाहीत. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुवठा करताना हेच अधिकारी विविध प्रकारची अवघड कागदपत्र आणण्याचे संकट लादत असल्याने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपासून परावृत्त करण्याचे काम केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा आदेश असूनही अनेक बँका आजही शेतकऱ्यांना पतपुरवठा करीत नाहीत़ रत्नागिरी जिल्हा फलोद्यान जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर राज्य सरकारचे याकडे विविध प्रकारे दुर्लक्ष झाल्याने आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत़ सरकारने याकडे डोळेझाक करू नये, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातील नाचणी पिकाच्या शेतीलाही आता मोठ्या प्रमाणात उतरती कळा लागली आहे़ खेडमध्ये काहीशी हीच अवस्था आहे. मात्र, गेल्या वर्र्षभरात तिळाची शेती काहीअंशी बहरली आहे. नाचणीची जागा तिळाच्या शेतीने घेतल्याने यावर्षी हे उत्पादन अधिक प्रमाणात होणार आहे़ या शेतीकरिता आवश्यक असे पोषक वातावरण आणि तंत्रज्ञान याविषयी खेड तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ असल्याने या पिकाविषयी साशंकता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ नजीक असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत येथील तज्ज्ञांची विविध मते असल्याचे जाणवते़ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १० तालुक्यात तिळाची शेती केली जात आहे. कोकणात भात, नाचणीबरोबरच आता तिळाची शेती दिसू लागली आहे. तिळाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते़ मात्र, याकरिता राज्य सरकारने या पिकाला संरक्षण देत कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले पाहिजेत. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ८३ एकरवर तिळाची लागवड केली आहे. कृषीविषयक आणि त्यावर आधारित शेतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठ नजीक असतानाही खेड तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नसल्याची ओरड कायम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था दापोलीत आहे़ त्याचा पुरेसा लाभ खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतीबाबतीत तालुका मागास राहीला आहे. याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होत आहे. बाजारपेठ आवश्यक शेतीमालाला बाजारपेठ आवश्यक.विद्यापीठाचे तंत्र बांधावर कधी जाणार.तीळाच्या शेतीला वाव.कोकणात फलोद्यानाला अधिक वाव. शासनाचे कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवण्याची गरज.