शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी राजकीय मोर्चेबांधणी

By admin | Updated: December 5, 2015 00:24 IST

जिल्हा परिषद : दापोली-चिपळूणच्या उमेदवारांमध्ये चुरस

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असून, नवीन अध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता जावकर आणि चिपळूणचे सदस्य बुवा गोलमडे यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सव्वातीन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ घटले आहे. कारण संगमेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे विलास चाळके आणि मंडणगडच्या राष्ट्रवादीच्या शीतल जाधव यांनी शिवसेनेमध्ये तर, राजापूरचे सुरेश लाड यांनी काँग्रेसला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. शीतल जाधव या समाजकल्याण समितीच्या सभापती पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे संजय कदम हे आमदारपदी निवडून आल्यानंतर भरणे गट आणि राजापूरचे राष्ट्रवादीचे जैतापकर हे अपात्र ठरल्यानंतर झालेल्या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ घटले आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे ३०, भाजपचे ९, राष्ट्रवादीचे १५, काँग्रेसचे १ आणि बविआचे २ सदस्य आहेत. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा असल्याने लाल दिव्याच्या गाडीसाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. राजापकर यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने दापोलीच्या सदस्या जावकर आणि चिपळूणचे गोलमडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.जावकर या दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती असून, त्यांनी सभापतीपदाच्या कालावधीमध्ये दापोली तालुक्यावर आपले नाव कोरले होते, तर गोलमडे हे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आहेत. जावकर या दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थक म्हणून मानल्या जातात. माजी आमदार दळवी यांच्या शिवसेनेतील राजकीय वजनामुळे दापोली तालुक्याला दोन वेळा अध्यक्षपद लाभले होते. मात्र, दळवी समर्थक रोहिणी दळवी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर संजय कदम यांनी शिवसेनेचा व जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दळवी यांच्यावर कदम यांनी विजय मिळवून ते आमदार झाले. जावकर या माजी आमदार दळवी यांच्या समर्थक असल्याने त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार ठरणार, अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्याचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचे गोलमडे यांना कितपत सहकार्य लाभते, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, दोन्ही बाजूनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असली तरी सव्वा वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी जावकर की, गोलमडे यांच्यापैकी कोण फायदेशीर ठरणार, याचाही विचार सेनेकडून होईल, असे मानले जात आहे. (शहर वार्ताहर)मागे वळून पाहताना. : युतीचे होते वर्चस्व पण...तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी शिवसेनेने २५, भाजप ८, राष्ट्रवादी १९, काँग्रेस ३ आणि २ जागांवर बविआने यश मिळवले होते. जिल्हा परिषदेत युतीचे वर्चस्व असताना केवळ महिला अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा जाधव यांच्या पारड्यात पडले होते. संपणार कार्यकालमनीषा जाधव यांच्यानंतर आमदार राजन साळवी यांचे समर्थक जगदीश राजापकर यांच्या रुपाने लांजा तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभले होते. राजापकर यांचा अध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाल २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.