शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी समाजाभिमुख व्हाव

By admin | Updated: February 13, 2015 00:55 IST

कुलसचिव नारखेडे : कोकण कृषी विद्यापीठात सेवा प्रतिमा कार्यशाळा रंगलीे

दापोली : जनता व पोलीस यांच्यातील नाते वृध्दिंगत होऊन बदलत्या काळानुरुप पोलीस यंत्रणा समाजाभिमुख होणे काळाची गरज आहे, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नारखेडे यांनी व्यक्त केले.कोकण कृषी विद्यापीठात दापोली, गुहागर, मंडणगड या तीन तालुक्यांतील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी ‘सेवा प्रतिमा एक गरज’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सिद्धेश नातू, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, दापोली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव, नवनाथ जगताप, शुभांगी म्हस्के उपस्थित होते.जनतेच्या मनात पोलीस खात्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर व्हायला हवा. लोकांमध्ये खात्याची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी जनता व पोलीस यातील दरी कमी व्हायला हवी. संकटात माणूस देवाचा धावा करतो. देवाप्रमाणेच गुन्हा घडला की, संकटात त्यांना पोलीस स्टेशनचा रस्ताही दिसतो. त्यांच्या मनात देवाबद्दलची जी प्रतिमा आहे, त्यासारखीच प्रतिमा पोलिसांचीसुद्धा आहे. म्हणून पोलिसांचा धावा केला जातो. पोलिसांकडून न्याय मिळेल, असे वाटते. समाजाला चांगली सेवा दिल्यास जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा उंचावेल. समाज व पोलीस यांच्यातील नाते सुधारल्यास समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाची माहिती पोलिसांना मिळते. पोलीस हा आपला शत्रू नसून मित्र असल्याची खात्री पटते. जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास न्याय मागण्यांसाठी जनता पोलिसांकडे स्वत: येऊ लागतील. परंतु त्यासाठी चांगली सेवा मिळायला हवी. समाजात पोलिसांची प्रतिमा बदलायला हवी, असे ते म्हणाले.समाज बदलतोय, त्याप्रमाणे पोलीसही बदलतोय. पूर्वी पोलिसांची चुकीची इमेज जनतेत निर्माण केली होती. बदलत्या काळात पोलिसांची इमेज समाजाभिमुख होत असून, जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले म्हणाले. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आभार मानले. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत पोलिसांचे ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. जनता व पोलीस यांचे नाते सुधारण्यावर भर देण्याचे शिकविण्यात आले. या कार्यशाळेला पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठी उपस्थिती राहिली होती. (प्रतिनिधी)