शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज गेली... पुणे, मुंबई येथे संपर्क साधा

By admin | Updated: July 15, 2014 00:14 IST

नवा फतवा : उपनगराध्यक्ष शहा यांनी दिला आंदोलनाचा इशारा

चिपळूण : जीवनावश्यक वस्तूंसह आज ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विजेची गरज भासू लागली आहे. हातावर पोट भरणाऱ्या व्यक्तीच्या घरातही आता वीज आली आहे. यापूर्वी वीज ग्राहकांची काही तक्रार असल्यास स्थानिक पातळीवर कार्यालयाशी संपर्क साधल्यास काही वेळातच तक्रारीचे निवारण केले जात होते. मात्र, आता वीज गेल्यास मुंबई, पुणे येथे संपर्क साधावा, या नव्या फतव्याने सर्वसामान्य ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत आहे. महावितरण कंपनीच्या या कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलताना दिला आहे.यापूर्वी एखाद्या ग्राहकाने चिपळूण येथे २५२८७४ या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधल्यास त्याच्या तक्रारीचे निवारण काही तासातच केले जात असे. मात्र, सध्या आपल्या घरातील वीज गेल्यास १८००२३३३४३५ (मुंबई), १८००२००३४३५ (पुणे) येथे संपर्क साधण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जात आहे. हे क्रमांक टोल फ्री असले तरी व्यस्त असल्याचे सांगितले जाते. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आपला ग्राहक क्रमांक व काय आहे, लाईट कशी गेली याचे कारणही नमूद करावे लागत आहे. त्यानंतर संबंधितांकडून जो ग्राहक त्या ठिकाणी राहात असेल त्याच्या जवळच्या कार्यालयात एसएमएसद्वारे तक्रार निवारण करण्याचा संदेश दिला जातो. मात्र, या प्रक्रियेला १२ तासांहून अधिक वेळ जात असून, ज्याच्या घरी फोन नाही, त्याने कोणाशी संपर्क साधायचा, असाही ग्राहकांमध्ये संभ्रम होत आहे, असे शाह यांनी सांगितले.महावितरण कंपनीची तक्रार निवारण्याबाबतची टोल फ्री क्रमांकाची सुविधाही फार अडचणीची असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? स्थानिक गाव पातळीवरच पूर्वीप्रमाणे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सर्व पक्षीयांतर्फे निवेदन दिले जाणार आहे. योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाह यांनी दिला आहे. (वार्ताहर)