शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला सावरत आंजर्लेवासीयांनी पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

दापोली / शिवाजी गोरे : निसर्ग आणि ताैक्ते वादळात उद्‌ध्वस्त झाल्यानंतर स्वत:चे घर सावरण्याचे कठीण आव्हान दापाेली तालुक्यातील आंजर्ले ...

दापोली / शिवाजी गोरे : निसर्ग आणि ताैक्ते वादळात उद्‌ध्वस्त झाल्यानंतर स्वत:चे घर सावरण्याचे कठीण आव्हान दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावातील नुकसानग्रस्तांसमाेर आहे; मात्र असे असले तरीही स्वत:चा संसार सावरता सावरता दुसऱ्याचा संसार उभा करण्याचे औदार्य गावातील ग्रामस्थांनी दाखविले आहे. वादळातून सावरलेल्या या गावातील ग्रामस्थांनी चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून लाखो रुपये गोळा केले. त्यातून पूरग्रस्तांना जेवणापासून, टिकणारे खाद्य पॅकेट्स, लहान मुलांचे कपडे, बाटल्या, घर साफसफाईसाठी लागणारे साहित्य, तसेच विविध प्रकारच्या कपड्यांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. सावणेकरीण देवी आपत्ती व्यवस्थापन समिती आंजर्लेतर्फे चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना कोणत्याही वस्तू रूपाने किंवा कमीत कमी १०० रुपये आर्थिक रूपाने आपण मदत करू शकता, असे आवाहन करण्यात आले हाेते. या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत मदत जमा करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत गोळा झाली. त्यामुळेच या गावाने चिपळूण आणि महाड या दोन्ही शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे.

एकीकडे आंजर्ले हे गाव दोन चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त झाले असतानाही या गावाने मोठ्या हिमतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आंजर्ले गावातील प्रत्येक वाडीतील नागरिकांनी प्रत्येक कुटुंबाकडून शंभर रुपयाची मदत गोळा करून त्याचा योग्य पद्धतीने विनियोग केला आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन कमिटीने जीवनावश्यक वस्तूचे किट बनवून लोकांना घरपोच उपलब्ध करून दिले आहेत. मदतीचा हात देताना गरीब व गरजवंतांना ही मदत कशी पोहोचेल यादृष्टीने नियाेजन करून त्या त्या गावात जाऊन लोकांना ही मदत दिली आहे.

------------------------

दापाेली तालुक्यातील आंजर्ले येथील सावणेकरीण देवी आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे पूरग्रस्तांना मदत देण्यात आली.