शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी ३६० प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: April 22, 2016 01:03 IST

फलोत्पादन अभियान : अनुदानासाठी ९० लाखाची मागणी

रत्नागिरी : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाकडे जिल्ह्यातील यांत्रिकीकरणासाठी ६ कोटी १० लाखांचा आराखडा पाठवण्यात आला होता. मात्र, २ कोटी ३० लाखांचाच निधी मंजूर करण्यात आला आहे. तूटपुंज्या निधीमुळे ७८० प्रस्तावांपैकी अद्याप ३६० प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केली असून, त्यांच्या अनुदानासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने ९० लाखांची मागणी केली आहे. सहा कोटी दहा लाखांच्या आराखड्यापैकी २ कोटी ३० लाखांचा आराखडा मंजूर करून डिसेंबरअखेर १ कोटी ८२ लाख खर्च करता येईल, असे राष्ट्रीय फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळातर्फे कळवण्यात आले आहे. मात्र, कृषी विभागाने २ कोटी ३० लाखांची यांत्रिक अवजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसंमत्ती दिली असल्याने अद्याप ३६० शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ७८० शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमत्ती दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून अवजारे विकत घेतली. मंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे ४२० शेतकऱ्यांना अवजारांचे अनुदान त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. परंतु, ३६० शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत.यांत्रिकी अवजारांमध्ये पॉवर टिलर, रोटरी टिलर, २० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर, पॉवर स्प्रेअर आदिंचा समावेश होता. मार्चअखेर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. कृषी विभागाच्या आश्वासनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनुदानच उपलब्ध होत नसल्यामुळे मंडळाने पूर्व संमत्तीवरही बंदी आणली आहे. त्यामुळे उर्वरित ३६० शेतकऱ्यांना बहुधा नवीन आर्थिक वर्षात पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)आर्थिक संकट : कर्ज काढून अवजारे खरेदीपावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना ही अवजारे मिळणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून अवजारे घेतली आहेत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.नव्याने पुन्हा अर्ज?अनुदान नसल्याने मंडळाने पूर्वसंमत्तीवरही बंदी आणली आहे. त्यामुळे ३६० शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागण्याची शक्यता आहे.