शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला पंढरीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षी १२ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे या वारीला रत्नागिरी विभागातून जादा गाड्या सुटत नसल्या, तरी पुणे विभागाच्या मदतीसाठी दरवर्षी ५० गाड्या पाठविल्या जातात, परंतु कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही वारी होणार नसल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गाड्या पाठविण्यात आलेल्या नाहीत. महामंडळाला जादा गाड्यांमुळे मिळणारे उत्पन्न मात्र थांबले आहे.

अन्य जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. पुणे विभागाच्या मागणीनुसार दरवर्षी पन्नास गाड्या रत्नागिरी विभागातून पाठविल्या जातात. सलग आठवडाभर गाड्या पंढरपूर मार्गावर धावत असल्याने मिळणारे उत्पन्न महामंडळाच्या खात्यात जमा होते.

कार्तिकीला जादा गाड्या

कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातून भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यामुळे रत्नागिरी विभागातून १२५ ते १५० जादा गाड्या सोडण्यात येतात, शिवाय काही भाविक दिंडी किंवा वारी घेऊन पायी पंढरपूरला जातात. मात्र, येताना एसटीने गावी परततात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जादा गाड्यांच्या वाहतुकीमुळे उत्पन्न प्राप्त होते. मात्र, तेही थांबले आहे.

वारीअभावी उत्पन्नावर परिणाम

गेले दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी एकादशीची वारी बंद असल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सलग आठवडाभर जादा गाड्यांमुळे १२ लाखांचे प्राप्त होणारे उत्पन्न थांबले आहे.

गतवर्षी दिवाळीत मंदिरे खुली करण्यात आली. मात्र, गर्दी टाळण्यासाठी यात्रेला बंदी होती. कार्तिकी एकादशीसाठी विभागातून सुटणाऱ्या जादा गाड्या गतवर्षी न गेल्याने उत्पन्नावर परिणाम झाला.

कोरोनामुळे गतवर्षी आषाढी एकादशीची वारी झाली नव्हती. या वर्षीही वारीसाठी परवानगी नाही. दरवर्षी न चुकता दर्शनासाठी पंढरपूरला जातो, परंतु सलग दोन वर्षे वारी नसल्याने दर्शनाची खंत तर आहे, शिवाय वारी काळातील वातावरण व अनुभूती याची प्रखर आठवण होते.

- श्यामल पाटील, रत्नागिरी

आषाढी एकादशीला जिल्ह्यातून जाणारे भाविक मोजकेच असल्याने जादा गाड्या साेडल्या जात नाहीत, परंतु कार्तिकी एकादशीला जादा गाड्या सोडतो.

आषाढीला पुणे विभागासाठी पाठविल्या जाणाऱ्या बसेस दोन वर्षे बंद असल्याने उत्पन्न घटले आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक