शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

‘फेम इंडिया’मध्ये पाेलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिक-एशिया पोस्टने घेतली असून, देशातील लोकप्रिय ‘जिल्हा पोलीस अधीक्षक २०२१’ च्या वार्षिक सर्वेक्षणात ५० जणांच्या यादीत डॉ. माेहितकुमार गर्ग यांचा समावेश करण्यात आला आहे.

सामाजिक स्वास्थ्यासाठी आपल्या जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतातील २०० पोलीस प्रमुखांची यादी विविध स्त्रोतांच्या आधारे आणि सर्वेक्षणाच्या आधारे फेम इंडिया मासिकाने आणि एशिया पोस्टने सर्व्हे केला. त्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुधारणे, कार्यक्षम कार्यशैली, लोकाभिमुख प्रशासन, दूरदर्शीपणा आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या कसोटीवर या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्या २०० अधिकाऱ्यांपैकी ५० लोकप्रिय पोलीस अधिकाऱ्यांची नावे फेम इंडियाने प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह महाराष्ट्रातील कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, तसेच नागपूर झोन २ च्या डीसीपी विनिता साहू यांचाही समावेश आहे.

डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात ई - एहसास मोहीम, आशा अभियान, जिल्ह्यातील अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोहीम, किनारपट्टी सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तसेच ‘बडी काॅप’ संकल्पनेतून रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांच्या माध्यमातून ४६८ बैठका घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली आहे.