शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाली परिसरात भातावर करपा रोग

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

शेतकरी संकटात : खोडकिडीसह निळ्या भुंंगेऱ्याचे प्रमाण अधिक

रत्नागिरी : पाली परिसरात उशिरा झालेल्या भात लावणीमुळे अद्याप तयार न झालेल्या भातपिकावर खोडकिडींसह निळे भुंगेरे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे अखेरच्या टप्प्यात असलेल्या भातपिकाला त्याचा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.सध्याच्या बदलत्या वातावरणात पाऊस लांबल्याने लावणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे नियोजनाच्या एक महिना उशिरा भात लावणी झाल्याने ते परिपक्व होण्याचाही कालावधीही लांबला. पण, सध्या पंधरा दिवस पावसाने मारलेली दडी, बदलते मळभी वातावरण, यामुळे खोडकिडी, निळे भुंगेरे, करपा यांचा बहुतांश ठिकाणी प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे भाताच्या पातींवर बारीक ठिपके दिसणे, पाने वाळणे असे प्रकार आढळून येत आहेत. तसेच भाताच्या लोंबीही आता तयार झालेल्या असल्याने निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच काही ठिकाणी भातपिकावर भूरकट पांढऱ्या रंगाची अळीही पडलेली दिसत आहे. विविध रोग या ढगाळ आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पडलेले आहेत. या करपा रोगावर संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.कृषी सहाय्यक प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. निवळी, चरवेली, नागलेवाडी, कापडगाव, पाली, साठरेबांबर, कशेळी, नाणीज आदी गावांमध्ये या रोगाची लागण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी भागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन पीक वाचवण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)