शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा पाेलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाला पकडण्यात चिपळूण पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला खेड तालुक्यातील लवेल येथून रविवारी रात्री अटक केली आहे. अवघ्या तीन दिवसात चिपळूण पोलिसांनी या आरोपीला पकडल्याने त्यांच्या या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

चार दिवसांपूर्वी शहरातील भोगाळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अत्याचार करणारा नराधम पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली हाेती. पोलिसांच्या हाती मध्यवर्ती बसस्थानक व भोगाळे येथील दीपक लॉजसमोरील सीसीटीव्ही फुटेज लागले होते. पीडित तरुणीने वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण त्यामध्ये कैद झाला होता. संबंधित तरूणाच्या हालचाली व चालण्याच्या पद्धतीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. याचवेळी दुसऱ्या पथकाने पीडित तरुणीचा मोबाईल व छत्री घटनास्थळावरून गायब झाल्याने त्या मोबाईलचे लोकेशन तपासले. ते लोकेशन खेड तालुक्यातील सात्विनगाव व लवेल दरम्यान आढळले.

पोलिसांनी लवेलच्या दिशेने तपास सुरू केला. यावेळी एका व्यक्तीने ताे एक व्यावसायिक असल्याचे सांगून त्याला ओळखले. त्यानुसार पाेलिसांनी त्याच्याकडे काही बोगस गिऱ्हाईक पाठवून त्या तरूणाच्या हालचाली व आवाज टिपला. तीनवेळा अशा पद्धतीने प्रयोग केल्यानंतर पोलिसांची खात्री पटली व अखेर रविवारी रात्री त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याप्रमाणे त्याची लवकरच ओळख परेड होणार आहे. संबंधित नराधमाला तत्काळ अटक केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक समद बेग व त्यांच्या पथकाचा आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सत्कार केला. यावेळी आमदार जाधव यांच्यासोबत फैयाज शिरळकर, रवींद्र कदम, आल्हाद वरवाटकर उपस्थित होते.

-------------------

विवाहित आणि आठ महिन्यांची मुलगी

या नराधमाला आठ महिन्यांची मुलगीही आहे. घटनेच्या दोन दिवस आधी तो तीन हजार रुपये घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर मुंबई एस. टी.ने पनवेल येथे गेला होता. पुन्हा मुंबई येथून तो बसने गुरुवारी दुपारी चिपळुणात आला. सायंकाळी तो बसस्थानकाच्या आवारात फिरत होता. त्यानंतर त्याने संबंधित पीडित तरुणी रस्त्याने एकटी जात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.