शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी केंद्रात ‘प्यादी’ अव्वल

By admin | Updated: December 2, 2014 00:25 IST

राज्य नाट्य स्पर्धा : रत्नागिरीच्या संकल्प कला मंचची बाजी

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीत संकल्प कला मंचने सादर केलेल्या ‘प्यादी’ नाटकासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली असून, व्दितीय क्रमांक गणेशगुळेच्या (ता. रत्नागिरी) अजिंक्यतारा थिएटर्सने सादर केलेल्या ‘मेला तो शेवटचा होता’ तर तृतीय क्रमांक बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाने सादर केलेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ नाटकाला जाहीर झाला आहे.प्रथम क्रमांक पटकावलेल्या ‘प्यादी’ नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून, नाटकाला रोख २० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ‘मेला तो शेवटचा होता’ नाटकाला रोख १५ हजार, तर ‘व्याकुळ संध्यासमयी’ नाटकाला रोख १० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक रोख १०,००० रूपये विनोद वायंगणकर (प्यादी), व्दितीय पारितोषिक ५००० रूपये दशरथ रांगणकर (मेला तो शेवटचा होता) यांना जाहीर झाले आहे. नेपथ्याचे प्रथम पारितोषिक चिन्मय रांगणकर (मेला तो शेवटचा होता), व्दितीय क्रमांक नंदकुमार भारती (प्यादी) यांना जाहीर झाले आहे. प्रकाश योजनेचे प्रथम बक्षीस श्याम चव्हाण (गोष्ट एका शाळेची), व्दितीय क्रमांक विलास जाधव (या व्याकुळ संध्यासमयी) यांना, तर रंगभूषेत प्रथम क्रमांक सत्यजीत गुरव (खेळ) व व्दितीय क्रमांक ओंकार पेडणेकर (मेला तो शेवटचा होता...) यांना मिळाला आहे. प्रथम क्रमांक विजेत्याला रोख ५००० तर व्दितीय क्रमांकाला तीन हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक व रोख ३००० रूपये गोपाळ जोशी (सुखांशी भांडतो आम्ही) व प्रज्ञा चवंडे (प्यादी) यांना जाहीर झाले आहे.अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र रक्षिता पालव (मेला तो शेवटचा होता...), पूजा जोशी (प्यादी), पूनम चांदोरकर (खेळ), सायली सुर्वे (या व्याकुळ संध्या समयी) दीपक कीर (काळोख देत हुंकार) योगेश हातखंबकर (गोष्ट एका शाळेची) अथर्व आंब्रडकर (मेला तो शेवटचा), सागर चव्हाण (गोष्ट एका शाळेची) यांना देण्यात येणार आहेत. वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या प्राथमिक फेरीत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास देशपांडे, सुरेश बारसे व मानसी राणे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)